

ChatGPT 10 Productivity Hacks: आजकाल अभ्यास असो, ऑफिसचं काम असो किंवा कंटेंट बनवणं… प्रत्येक गोष्टीत वेळ कमी आणि काम जास्त अशी परिस्थिती आहे. अशा वेळी ChatGPT हा फक्त प्रश्न-उत्तर देणारा AI राहिलेला नाही. तो आता विद्यार्थी, नोकरदार, कंटेंट क्रिएटर्स आणि छोट्या व्यवसायिकांसाठी एक जबरदस्त टाइम-सेव्हिंग टूल बनला आहे.
ChatGPT योग्य पद्धतीने वापरला, तर काही कामांना तासन्तास वेळ लागत होता ती काही मिनिटांत होऊ शकतात. आज आपण ChatGPT च्या 10 ट्रिक्स जाणून घेणार आहोत.
बॉसला मेल लिहायचा, क्लायंटला रिप्लाय द्यायचा… पण शब्द सुचत नाहीत? ChatGPT ला फक्त एवढं सांगा, मेलचा टोन प्रोफेशनल/फ्रेंडली हवा आणि विषय काय आहे हे सांगा. AI लगेच मेलचा ड्राफ्ट तयार करून देतो.
ब्लॉग, न्यूज, डिजिटल मार्केटिंग करणाऱ्यांसाठी SEO म्हणजे मोठा डोकेदुखीचा विषय असतो.
ChatGPT च्या मदतीने हेडलाईन, मेटा डिस्क्रिप्शन, कीवर्ड्स आणि SEO-फ्रेंडली आर्टिकल पटकन तयार होऊ शकतं.
UPSC, MPSC, SSC, बँकेच्या परीक्षा… या परिक्षांचा अभ्यास करताना सर्वात कठीण गोष्ट म्हणजे काय महत्त्वाचं आणि काय सोडायचं हे ठरवणं. ChatGPT कठीण टॉपिक्स सोप्या भाषेत समजावतो, नोट्स बनवतो आणि प्रॅक्टिसचे प्रश्नही देतो.
कधी-कधी मोठ्या नोट्स किंवा PDF समजायला जड जातात. ChatGPT त्या माहितीला छोट्या मुद्द्यांमध्ये, सोप्या भाषेत आणि वाचायला सहज अशा फॉरमॅटमध्ये बदलू शकतो.
Python, Java, JavaScript… कोडिंग शिकणाऱ्यांसाठी ChatGPT एकदम उपयोगी आहे.
तो कोड लिहून देतो, चुका सुधारतो, आणि प्रत्येक स्टेप समजावूनही सांगतो.
काम खूप आहे पण वेळ कसा मॅनेज करायचा? ही समस्या अनेकांची असते.
ChatGPT तुमच्या रूटीननुसार डेली प्लॅन, स्टडी टाइमटेबल, फिटनेस शेड्युल तयार करू शकतो.
इंटरव्ह्यूची तयारी, इंग्लिश ग्रामर, वाक्यरचना… यासाठीही ChatGPT मदत करतो.
तो चुका सुधारतो, वाक्य सुधारतो आणि उत्तरांचे सॅम्पल देतो.
नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, पण कसं करायचं हे माहित नाही? ChatGPT आयडिया ब्रेनस्टॉर्मिंग, बेसिक मार्केटिंग स्ट्रॅटेजी, आणि सुरुवातीचा प्लॅन तयार करायला मदत करतो.
डिजिटल मार्केटिंग, शेअर मार्केट, AI टूल्स, फ्रीलांसिंग… काहीही शिकायचं असेल तर ChatGPT स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन करू शकतो.
अर्ज लिहायचा, तक्रार करायची आहे, फॉर्म समजून घ्यायचा किंवा एखादा निर्णय घ्यायचा…
ChatGPT थेट आणि सोपं उत्तर देतो, त्यामुळे वेळ वाचतो.
ChatGPT मुळे अभ्यास, नोकरी आणि व्यवसाय या तिन्ही गोष्टीत वेळ आणि मेहनत वाचू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, AI ने दिलेली माहिती नीट तपासा, गरज पडली तर फॅक्ट चेक करा. योग्य वापर केला, तर ChatGPT हे वेळ वाचवणारं डिजिटल टूल आहे.