Pradeep Purnekar Case: 'होय, मी पाचही आरोपींना ओळखतो, पण...,' माजी महापौरांच्या पतीचा मोठा खुलासा; ठाण्यात खळबळ

Rajendra Shinde Pradeep Purnekar Murder Case: ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदे यांची नऊ तास चौकशी करण्यात आली.
Rajendra Shinde Pradeep Purnekar Murder Case
Rajendra Shinde Pradeep Purnekar Murder Case Pudhari
Published on: 
Updated on: 

Rajendra Shinde Pradeep Purnekar Murder Case: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने तपास सुरु केला आहे. या प्रकरणात शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली. यावेळी हत्येप्रकरणी अटक केलेले पाचही आरोपी आपल्या ओळखीचे असल्याचे राजेंद्र शिंदे यांनी सांगितले. मात्र, या हत्येशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

आरोपींशी ओळख असल्याचे मान्य

मंगळवारी गुन्हे शाखेने राजेंद्र शिंदे यांना चौकशीसाठी बोलावले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अटकेतील आरोपींसमोर बसवून विविध प्रश्न विचारले. आरोपी आपल्याकडे कामासाठी येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पत्नी नगरसेविका असल्यामुळे परिसरातील अनेक लोकांशी संपर्क येतो. त्यातूनच आरोपींशी ओळख झाली. मात्र, हत्येच्या कटात आपला सहभाग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पूर्णेकर यांच्या मुलाचे गंभीर आरोप

दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी यापूर्वीच मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हत्येपूर्वी काही दिवस आरोपींना राजेंद्र शिंदे यांच्या 'निळकंठ' इमारतीबाहेर पाहिल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच ठिकाणी हत्येचा कट रचल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

Rajendra Shinde Pradeep Purnekar Murder Case
Jailer 2 X Review: रजनीकांतचा ‘जेलर 2’ चित्रपट हिट की फ्लॉप? सोशल मीडिया युजर्सनी स्पष्टच सांगितलं, किती कोटी कमावणार?

कार्यालयात घुसून केली होती हत्या

29 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मनोरमानगर येथील कार्यालयात प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे.

Rajendra Shinde Pradeep Purnekar Murder Case
Imran Khan Notice: अभिनेता इमरान खानला भारत सोडण्याची नोटीस; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, नेमकं कारण काय?

आता आरोपी आणि राजेंद्र शिंदे यांच्यातील फोनवरील संभाषण, आर्थिक व्यवहार आणि भेटीगाठींची माहिती पोलीस तपासत आहेत. पूर्णेकर कुटुंबीयांनी स्वतंत्र तपासाची मागणी केली असून, पुढील चौकशीत नेमके काय समोर येते, याकडे ठाण्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news