Pradeep Purnekar Case: पूर्णेकर हत्याप्रकरणी पोलिसांकडून राजेंद्र शिंदे यांची चौकशी सुरू; उपमुख्‍यमंत्री शिंदेंनी विधान केले अन्‌ यंत्रणा हलली

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई; माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर पूर्णेकर कुटुंबाचे आरोप, निष्पक्ष तपासाची मागणी
Pradeep Purnekar Case
Pradeep Purnekar Casepudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे: ठाण्यातील शिवसेना विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणाचा तपास आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. पूर्णेकर यांच्या खुनाचा सूत्रधार म्हणून माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांना अटक करण्यासाठी पूर्णेकर कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचे जाहीर केले.

तर याप्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळी स्पष्ट केल्यानंतर काही तासांनी ठाणे गुन्हे शाखेने राजेंद्र शिंदे यांना बोलावून चौकशी सुरु केली. खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात शिंदे आणि आरोपींना समोरासमोर बसवून पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती.

Pradeep Purnekar Case
Sahil Wakode Case: साहिल वाकोडे प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी; पुन्हा ‘चलो आयआयटी’ आंदोलनाची हाक

प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास मनोरमा नगरमधील त्यांच्या कार्यालयात हत्या झाली होती. पाच मारेकऱ्यांनी कार्यालयात घुसून प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या आणि त्यांच्यावर कोयत्याने वार करुन त्यांची निर्घृण हत्या केली.

याप्रकरणात पूर्णेकर कुटुंबाने ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर खुनाचे सूत्रधार म्हणून गंभीर आरोप केले. त्यानंतर ठाण्यात सर्वपक्षीय भयमुक्त ठाण्यासाठी पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला.

ही हत्या क्लस्टर आणि ड्रग्ज माफियांना विरोध केला म्हणून केल्याचा आरोप होत आहे. तसेच ही हत्या राजकीय वैर आणि स्थानिक पातळीवर वर्चस्वाच्या लढाईतून मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनीच प्रदीप पूर्णेकर यांना सुपारी देऊन संपवले, असा दावा पूर्णेकरांच्या कुटुंबाने वारंवार केलेला आहे. मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. कापूरबावडी पोलीस ठाण्यात पार्थिव ठेवण्यात आले आणि वातावरण तंग झाले.

Pradeep Purnekar Case
Teacher Online Attendance: शिक्षकांनो लक्ष द्या! आता रोज ऑनलाइन हजेरी बंधनकारक; राज्य सरकारचा आदेश

अखेर खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्यानंतर पोलिसांकडून पुरवणी एफआयआरमध्ये राजेंद्र शिंदे आणि मिनाक्षी शिंदे यांच्या नावाचा समावेश करण्यात आले. त्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनी याप्रकरणात मला अडकविण्याचा प्रयन्त असून कधीही चौकशीला तयार असल्याचे स्पष्ट केले होते.

मात्र, या दोघांनाही चौकशीला बोलावण्यात आलेले नव्हते. त्यामुळे नाराज झालेल्या राम पूर्णेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन शिंदे दाम्पत्यांच्या अटकेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करण्याचे जाहीर केले होते.

मुख्य आरोपी, राजेंद्र शिंदे यांची समोरासमोर चौकशी

ठाणे गुन्हे पोलिसांनी राजेंद्र शिंदे यांना खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात बोलावले आणि प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपी संतोष कनजिया उर्फ टल्ली आणि आरोपी अमित जयकिशन सिंग उर्फ पपलू यांच्या समोर बसवून एकत्रित चौकशी सुरु केली आहे.

या चौकशीतून पोलिसांच्या हाती एखादा महत्त्वाचा दुवा लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी क्राईम ब्रांचकडे सध्या हत्येत सहभागी पाचही आरोपी अटकेत आहेत. त्यांना देखील समोरासमोर बसवून उलट तपासणी करण्यात आली. त्यामुळे या चौकशीतून कोणती माहिती समोर येते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news