TMC Politics : विरोधी पक्षनेते पदासाठी दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चुरस

विलीनीकरण झाल्यास एमआयएमच्या पाठिंब्यामुळे अजित पवार गटाचेच पारडे जड
TMC Politics
विरोधी पक्षनेते पदासाठी दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चुरसpudhari photo
Published on
Updated on

ठाणे : प्रवीण सोनावणे

सन्मानजनक पद मिळाले नाही तर विरोधी पक्षात बसण्याची भूमिका घेणारी भाजप सत्तेत सामील झाल्यानंतर आता विरोधी पक्षनेते पदासाठी दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक निवडून आले आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 9 नगरसेवक निवडून आले आहे.

दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले तरी,तरी एमआयएमच्या पाच नगरसेवकांचा पाठिंबा आम्हाला असल्याचा दावा अजित पवार गटाने केला असल्याने विरोधीपक्षनेते पदासाठी अजित पवार गटाचेच पारडे जड असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

TMC Politics
Bhiwandi Crime : भिवंडीतील माजी महापौर विलास पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे 75 नगरसेवक निवडून आले असून त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर युतीमध्ये निवडणूक लढवल्याने भाजपला याचा सर्वाधिक फटका पडल्याने त्यांचे केवळ 28 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेचा नगरसेवक विराजमान होणार हे निश्चित झाले होते. मात्र जर सन्मानजनक पदे नाही मिळाली तर विरोधी बाकावर बसण्याची भूमिका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली होती.

मात्र या भूमिकेला तिलांजली देत सत्तेत सहभागी होत भाजपने सध्या तरी उपमहापौर पद हे आपल्या पदरात पाडून घेतले आहे. त्यामुळे आता ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षाची जबाबदारी दोन्ही राष्ट्रावादीकडे आली आहे. राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ठाणे महापालिकेची निवडणूक मात्र स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊन त्यांनी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवली.तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ही निवडणूक काँग्रेस वगळता महायुतीमध्ये लढवली. यामध्ये उबाठाला केवळ एकाच जागेवर यश मिळाले असून मनसेला तर खाते देखील उघडता आले नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने मात्र 12 जागा जिंकल्या आहेत.

TMC Politics
India US Trade Agreement : भारत-अमेरिकेच्या बाजारपेठांमध्ये उभय देशांना मुक्त प्रवेश

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्याने एमआयएमच्या तिकिटावर निवडून आलेल्या सहर शेख आणि आणि इतर एमआयएमचे नगरसेवक जितेंद्र आव्हाड यांना पाठिंबा देण्याच्या ऐवजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठींबा देण्याची दाट शक्यता आहे. अजित पवार गटाचा तसा दावा देखील आहे. त्यामुळे विलीनीकर झाल्यास तसेच एमआयएमच्या पाठिंब्यावर अजित पवार गटाचाच नगरसेवक ठाणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी बसण्याची दाट शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news