Narendra Pawar Case: नरेंद्र पवारचा अटकपूर्व जामीन फेटाळला; भिवंडी न्यायालयाचा आदेश

तपासासाठी पोलिसांकडून अटक आवश्यक असल्याचा युक्तिवाद
Narendra Pawar Case
Narendra Pawar CasePudhari
Published on: 
Updated on: 

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील बापगाव येथील शेतघरात महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाप्रकरणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार याला अटकपूर्व जामीन मिळू शकलेला नाही.

पडघा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पवार यांनी भिवंडी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ए. ए. कारंडे यांच्यासमोर सुनावणी झाली. सोमवारी न्यायालयाने पवार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

या प्रकरणातील आरोपांनंतर पवार याने अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. २३ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत आरोपींच्या वतीने तसेच तपास अधिकाऱ्यांकडून युक्तिवाद करण्यात आला होता.

Narendra Pawar Case
Ulhas Vaitarna Water: ठाण्यात पाणीटंचाई, तरीही ५४ टीएमसी गोदावरीकडे? पाणी आमचे, हक्कही आमचा! शाई-काळू धरणग्रस्तांचा संताप

त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तपासासाठी काही महत्त्वाचे पुरावे हस्तगत करणे बाकी असून, बापगाव येथील संबंधित शेतघरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर मिळवणे तसेच कथित घटनेत वापरलेली कार ताब्यात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पवार याच्या कोठडीतील चौकशीची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद तपास यंत्रणेने केला होता.

या प्रकरणात पवार यांच्यासह बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरुद्धही पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या आरोपांसह शस्त्र कायद्यातील कलम ३ आणि २५ अंतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आल्याचे न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान समोर आले आहे.

Narendra Pawar Case
Kalyan Land Fraud: विकास कराराच्या नावाखाली शेतकऱ्यांना २२.५० कोटींचा गंडा? गांधारीतील १११ गुंठ्यांच्या प्रकल्पाचा वाद चिघळला

दोन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याचे यापूर्वी समोर आले होते. त्यासाठी पोलिसांनी सहा पथके तयार केली असून, मुंबईतील विमानतळे आणि रेल्वे स्थानकांवरही पाळत ठेवण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news