Salary During Jail KDMC: जेलमध्ये 40 दिवस असतानाही केडीएमसी कर्मचाऱ्याला पगार; कल्याण-डोंबिवली महापालिकेचा धक्कादायक प्रकार उघड

बलात्कार प्रकरणातील आरोपी कर्मचारी तुरुंगात असतानाही वेतन रोखले नाही; प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
Salary During Jail KDMC:
Salary During Jail KDMC:Pudhari
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली तब्बल 40 दिवस जेलमध्ये असलेल्या एका कर्मचाऱ्याला महापालिकेकडून पगार देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भयंकर प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी समाजमाध्यमांद्वारे जागरूक नेटकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.

Salary During Jail KDMC:
Karjat ST Bus Car Accident: कर्जत-चौक मार्गावर एसटी बस-कारची भीषण धडक; बांधकाम व्यावसायिक गंभीर जखमी

डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यात 3 मे 2025 रोजी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लग्नाचे अमिष दाखवून एका तरूणीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद होताच पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली होती. अटकेनंतर आरोपी तब्बल 40 दिवस न्यायालयीन कोठडीत, अर्थात जेलमध्ये होता. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. मात्र, अटकेच्या वेळी आणि त्यानंतरच्या तपासातही हा आरोपी सरकारी कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांच्या समोर आली नव्हती. तपास सुरू असतानाच सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर 27 डिसेंबर 2025 रोजी मानपाडा पोलिस ठाण्याच्या

Salary During Jail KDMC:
Hindi language issue Maharashtra: हिंदी सक्तीऐवजी संस्कृत भाषा सक्तीची करावी : हभप शिवाजी महाराज सातपुते

अधिकाऱ्यांनी केडीएमसी प्रशासनाला पत्र पाठवले. या पत्रात हा तुमचा कर्मचारी असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आरोपी असलेला हा कर्मचारी 40 दिवस जेलमध्ये होता, अशी माहिती देण्यात आली. हे समोर येताच महानगरपालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली. हा केडीएमसीच्या फ प्रभाग कार्यालयात कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वात संतापजनक बाब म्हणजे, जेलमध्ये असतानाही महानगरपालिकेने त्याचा पगार रोखलेला नव्हता.

Salary During Jail KDMC:
Sharmila Pimpalolkar Thane Mayor: शर्मिला पिंपळोलकर यांनी स्वीकारला महापौरपदाचा कार्यभार

शासकीय नियम पायदळी तुडवणारे कोण ?

हा कर्मचारी 40 दिवस गैरहजर असतानाही त्याची हजेरी नेमकी कुणी आणि कशी लावली ? तसेच त्याला पगार कसा देण्यात आला ? आदी प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. या प्रशासकीय आणि तांत्रिक घोळाला कारणीभूत कोण आहेत ? याचा उलगडा करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी समाज माध्यमांवर जागरूक कल्याण-डोंबिवलीकरांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news