

ठाणे : महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर - गायकवाड ह्यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर - गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले.
तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित उपमहापौर कृष्णा दादू पाटील यांनाही उपमहापौर पदाचा कार्यभार देण्यात आला. यावेळी भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, शिवसेना गटनेते पवन कदम, तसेच शिवसेना भाजप महायुतीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (छाया : अनिषा शिंदे)