डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : नवीन वर्षाचे दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. डोंबिवलीत या स्वागत यात्रेचे यावर्षी २५ वे वर्ष असून स्वागत यात्रेत सहभागी होण्यासाठी जम्मू येथून १५ मुलं दाखल झाली आहेत. मंगळवारी डोंबिवलीतील सर्वेश सभागृहात संस्कार भारती रांगोळीचे प्रशिक्षण घेतले. तर भागशाळा मैदान येथे जम्मू कशिमर येथील पारंपारिक नृत्य सादर केले.
या संस्थेतर्फे दोन वर्षापूर्वी काही जम्मू काश्मिरी विद्यार्थी स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर कोरोनामुळे या उपक्रमात खंड पडला. यावर्षी स्वागत यात्रेचे २५ वे वर्ष आहे. आपल्या संस्कृतीची आदान प्रदान व्हावी यासाठी हा उपक्रम दरवर्षी होतो.
या कार्यक्रमावेळी रांगोळी प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये मुलांमध्ये 3 तर 12 मुली हे काश्मीरचे आहेत. हे सर्व विद्यार्थी जम्मू येथील कीलंबी पंकजा वल्ली यांच्या आदिती प्रतिष्ठान वसतिगृहातील राहतात, अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
आम्हाला इथे आल्यानंतर खूप शिकायला मिळाले. शंख, कमळ, ओम , श्री, अशा, सर्प रेषा असे रांगोळीचे प्रकार शिकवण्यात आले आहेत, असे काश्मिरची विद्यार्थींनी प्रियांकाने माहिती दिली.
यावेळी वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेनुसार नव वर्ष स्वागत यात्रेत रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात येणार असल्याचे संस्कार भरती पदाधिका-यांनी सांगितले.
.हेही वाचा