

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : आई, बाबांना कचरा वेचण्यासाठी मदत करून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अभ्यास करणाऱ्या कचरावेचक मुलांनी १० वीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. १४ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून ९ विद्यार्थिंनीचा त्यात समावेश आहे.
उत्तीर्ण विद्यार्थी आपल्या आई वडिलांना कचरा वेचण्यास मदत करतात. कचरा वेचूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो. कल्याण मधील मुलांसोबत काम करणारी अनुबंध संस्था मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य करत असते. कल्याणमधील शांतीनगर आदिवासी वाडीतील भाग्यश्री वाघे ही स्वतः कचरा वेचण्याचे काम करते. दहावी पास होणारी ती त्या वाडीतील पहिली मुलगी ठरली आहे.
नांदकरवाडी येथील मुले रोजंदारीची कामे करीत असतात. वाडीतील मुले ही दहावी पहिल्यांदाच पास झाले आहेत. शशांक प्राथमिक विद्यालय आणि छत्रपती शिक्षण मंडळ माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होता.
हेही वाचलंत का ?