दहावी निकाल; लातूर विभागात १०० टक्के गुण मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी | पुढारी

दहावी निकाल; लातूर विभागात १०० टक्के गुण मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी

लातूर; पुढारी वृत्तसेवा : लातूर विभागाचा दहावीचा निकाल ९७.२७ टक्के लागला असून नेहमीप्रमाणे उत्तीर्णतेत मुलींनीच बाजी मारली. राज्याच्या निकालात लातूर विभाग तिसऱ्या क्रमांकावर स्थिरावला आहे. विभागात उस्मानाबाद जिल्हा प्रथम आला आहे. राज्यात १२२ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले असून त्यात सर्वाधिक ७० विद्यार्थी लातूर विभागाचे आहेत.

विभागात १ लाख ७ हजार ९५० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. १ लाख ५ हजार ८९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. १ लाख ३ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी सांगितले. उत्तीर्णतेत ९८.३४ टक्के मिळवत मुलींनी आघाडी घेतली. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.०६ अशी राहिली आहे.

विभागात उस्मानाबाद जिल्हा ९७.८४ टक्के मिळवून प्रथम आला आहे. तेथे २२ हजार २२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २१ हजार ८१७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. २१ हजार ३४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर जिल्ह्याचा निकाल ९७.६३ टक्के लागला आहे. ३९ हजार ६१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ३९ हजार ४४ प्रविष्ठ झाले. त्यापैकी ३८ हजार १२१ उत्तीर्ण झाले. नांदेड जिल्ह्याचा निकाल ९६.६८ टक्के लागला आहे. ४६ हजार ११० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ४५ हजार २९ प्रविष्ठ झाले. त्यापैकी ४३ हजार ५३५ उत्तीर्ण झाले. परीक्षेदरम्यान विभागात ६१ गैरप्रकार आढळून आले. त्यात ३५ लातूर , १५ उस्मानाबाद तर ११ नांदेड जिल्ह्यातील होते.

हे ही वाचलेत का ?

Back to top button