

कल्याण पुढारी वृत्तसेवा : मुलाचा खून झाल्याने कोर्टात येणाऱ्या आरोपींना मारण्याचा कट मुलाच्या बापाने मुलाच्या एका मित्रासह केला होता. बुरखा घालून कोर्टात गेलेल्या मुलाचा बापाला आणि मित्राला पोलिसांनी ओळखले. आणि त्यांचा डाव उधळला गेला. दरम्यान जळगाव पोलिसांनी मुलाच्या बापाला अटक केली. तर बापासमवेत आलेल्या मित्राने पिस्तुलसह पळ काढला. दरम्यान मंगला एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या या आरोपीस कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे असलेले गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे हस्तगत केले आहे. (Kalyan)
सुरेश हींदाते असे या आरोपीचे नाव असून त्याला रेल्वे पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नशिराबाद येथे २१ सप्टेंबर २०२२ रोजी धम्मप्रिया सुरळकर याचा खून झाला होता. या प्रकरणातील संशयित आरोपीना काल कोर्टात हजर केले जाणार होते. याची माहिती मयत तरुणाच्या वडिलांना मिळाली. खुनाचा बदला घेण्यासाठी बापाने मुलाच्या मित्रासोबत काल सकाळी ११ वाजेच्या सुमारास महिलेचा बुरखा परिधान करीत जळगाव गाठले. पर्समध्ये गावठी पिस्तूल व ५ जिवंत काडतूस घेत तो एका मंदिरावर बसला होता. वाहतूक शाखेचे परमेश्वर जाधव यांनी त्याची चौकशी केली. यावेळी पोलिसांना त्याचा संशय आल्याने ताब्यात घेवून शहर पोलिसात आणले असता त्याने सर्व कबुली दिली. मात्र त्याच्या सभेत असलेला मित्र पळाल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले. यासंदर्भात सर्व पोलीस ठाण्यात माहिती दिली होती. मंगला एक्सप्रेस मधून प्रवास करत असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना मिळताच आज सकाळी कल्याण रेल्वे पोलिसांनी मंगला एक्सप्रेसमधून सुरेश हिंदाते या आरोपीला अटक केली आहे. दरम्यान त्याच्या कडून गावठी पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे ताब्यात घेतल्या असून शस्त्र बाळगल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला आहे.
हेही वाचा