Taliban Attack In Torkham Pakistan : पाक पोलिस-तालिबान; चकमक तोरखम भागातील घटना | पुढारी

Taliban Attack In Torkham Pakistan : पाक पोलिस-तालिबान; चकमक तोरखम भागातील घटना

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानातील तोरखममध्ये तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान आणि पाकिस्तान पोलिसांत जोरदार चकमक सुरू आहे. आतापर्यंत अनेकांचा मृत्यू या चकमकीत झाल्याचे सांगण्यात येते. अफगाण पत्रकार अब्दुल हक ओमेरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. (Taliban Attack In Torkham Pakistan)

पाकिस्तानच्या प्रत्येक राज्यात पोलिस प्रथम निरपराधांना तुरुंगात कैद करतात, नंतर चकमक झाल्याचे दाखवून त्यांचा खात्मा करतात. त्याचा सूड आम्ही पोलिसांवर उगवत आहोत. (Taliban Attack In Torkham Pakistan)

महिनाभरात तालिबानने पोलिसांवर 3 मोठे हल्ले केले. आधी इस्लामाबाद, नंतर पेशावर आणि 2 दिवसांपूर्वी कराची पोलिस मुख्यालयावर तालिबानने हल्ला केला होता. त्यात एकूण 116 पोलिस मरण पावले आहेत.

पाकिस्तान पोलिसांनी पाकिस्तान लष्कराचे गुलाम बनू नये. आम्ही तूर्त हल्ले करतच राहू. पोलिसांनी बनावट चकमकी बंद केल्याशिवाय आमचे हल्ले थांबणार नाहीत, असा इशारा एका दिवसांपूर्वीच तालिबानने दिला होता.

अधिक वाचा :

Back to top button