Thane Crime News
Thane Crime News : पाणबुड्या, जहाजाची पाकिस्तानला पुरविली माहिती; एटीएसने ताब्यात घेतलेल्या ठाण्याच्या रवी वर्माबाबत मोठा गौप्यस्फोटFile Photo

Thane Crime News : पाणबुड्या, जहाजाची पाकिस्तानला पुरविली माहिती; एटीएसने ताब्यात घेतलेल्या ठाण्याच्या रवी वर्माबाबत मोठा गौप्यस्फोट

पाकिस्तानी महिला इंटेलिजन्स ऑपरेटिव्हला माहिती पुरविणारा कळव्यातील रविकुमार वर्मा हा एक नव्हे तर दोन पाकिस्तानी महिलांच्या संपर्कात होता.
Published on

Information provided to Pakistan about submarines, ships; Big revelation about Ravi Verma of Thane who was arrested by ATS

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

पाकिस्तानी महिला इंटेलिजन्स ऑपरेटिव्हला माहिती पुरविणारा कळव्यातील रविकुमार वर्मा हा एक नव्हे तर दोन पाकिस्तानी महिलांच्या संपर्कात होता. त्याने या दोन्ही महिलांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी भारतीय नौदल आणि डॉकयार्ड मधील पाणबुड्या व जहाजाची माहिती पाठवली होती असे एटीएसच्या तपासातून समोर येत आहे. कळव्यातील रवी वर्मा यास गुरुवारी एटीएस पथकाने अटक केली होती. संगणकावर चित्रफित बनवून त्याने १४ पाणबुड्या आणि जहाजांची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचे एटीएसच्या तपासातून समोर आले आहे.

Thane Crime News
Thane : डोंबिवलीत ऑनलाईन गेमचा नाद बेतला जीवावर; कर्जाच्या तगाद्यामुळे तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

नेव्हल डॉकमध्ये ज्युनियर मेकॅनिकल फिटर इंजिनियर असलेला रवी वर्मा मूळचा उत्तर प्रदेशातील अयोध्यातला राहणारा आहे. तो गेल्या काही वर्षांपासून कळव्यात राहतो. तर त्याची आई काही महिन्यापूर्वीच ठाण्यात आली आहे. रवी वर्माचे वडील नशेच्या आहारी गेलेले असून त्याची एक घटस्फोटित बहीण आहे. रवी वर्मा हाच कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळतो. परंतु त्यास देखील गेल्या काही दिवसांपासून टीबीचा आजार झालेला आहे.

घरात पैशांची कमी असल्याने त्रस्त असलेला रवी वर्मा नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत दोन पाकिस्तानी महिलांच्या संपर्कात होता. पायल शर्मा आणि इस्त्रीत नावाच्या या दोघी महिलांशी त्याची ओळख फेसबुकवर झाली होती. त्यानंतर हळूहळू रवी वर्मा व या महिलांमध्ये चॅटिंग सुरू झाली. नंतर या महिलांनी रवी वर्माशी व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्कात साधण्यास सुरवात केली.

Thane Crime News
Kalyan School Wall Collapse | कल्याणात शाळेची भिंत कोसळून ११ वर्षीय मुलगा ठार

याच दरम्यान या पाकिस्तानी महिलांनी एका प्रोजेक्टसाठी भारतीय जहाजांची माहिती रविकडून मागितली. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात भेटू असे आमिष दाखवून या महिलांनी त्याला आपल्या जाळ्यात गुंतवून ठेवले. या महिलांकडूम वर्माकडे जहाजांची व पाणबुड्याबाबत माहितीचा मागण्याचा ससेमिरा सतत सुरू होता.

Thane Crime News
Ambernath Crime: कल्याणच्या प्रेमी युगुलानं संपवलं आयुष्य; अंबरनाथमधील निर्जनस्थळी आढळले मृतदेह

वर्माच्या बँक खात्यात पाकिस्‍तानमधून मोठी रक्‍कम जमा झाल्याचे स्पष्ट

पाकिस्तानी महिलांची रवी वर्मासोबत सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर या महिलांनी त्याच्या सोबत अश्लील चॅटिंग करणे सुरू केले होते. आम्ही तुला प्रत्येक्षात भेटणार आहोत अशी भुरळ घालून त्यास या महिलांनी सतत गुंतवून ठेवले होते. तर त्याची आर्थिक, परिस्थिती बिकट असल्याने त्याला आर्थिक मदतही या महिलांनी केली. एटीएसच्या तपासातून वर्माच्या बँक खात्यात पाकिस्तान मधून मोठी रक्कम झामा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news