Thane Crime News
डोंबिवलीत ऑनलाईन गेमचा नाद बेतला जीवावर; कर्जाच्या तगाद्यामुळे तरुणाने उचलले टोकाचे पाऊलFile Photo

Thane : डोंबिवलीत ऑनलाईन गेमचा नाद बेतला जीवावर; कर्जाच्या तगाद्यामुळे तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

Thane Crime : देसले पाड्यातील घटना
Published on

डोंबिवली : डोंबिवलीत ऑनलाईन गेमचा नाद ३० वर्षीय तरूणाच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. या तरूणाने गेमच्या व्यसनामुळे वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले होते. वित्तीय संस्थांनी दिलेले कर्ज या तरूणाला फेडता आले नाही. संस्थांनी वसूलीसाठी तगादा लावल्यामुळे या तरूणाने विषारी किटकनाशक पिऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना गुरूवारी (दि.३०) डोंबिवलीतील देसले पाड्यात घडली.

Thane Crime News
Thane Crime News | गुजरात-महाराष्ट्राचे गांजा कनेक्शन खंडित

मोहित त्रिवेंद्र पुन्दीर (वय ३०) असे या तरूणाचे नाव आहे. या घटनेची माहिती मुंब्य्रात राहणाऱ्या फैजान शेख नावाच्या तरूणाने मानपाडा पोलिस ठाण्यात दिली. या माहितीनुसार पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून नोंद करून तपास सुरू केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मोहित पुन्दीर याला ऑनलाईन गेम खेळण्याचे व्यसन जडले होते. या गेमच्या नादात त्याने अनेक वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले होते. अनेक संस्थांकडून घेतलेले कर्ज मोहित ठरलेल्या वेळेत फेडू शकत नव्हता. देणेकरी संस्थांनी वसूलीसाठी मोहितच्या मागे तगादा लावला. कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने एवढी रक्कम आपण उभी करायची कशी ? या नैराश्येतून मोहितने गुरूवारी राहत्या घरी विषारी किटकनाशक प्राशन केले. त्याला उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Thane Crime News
Thane Crime News | 63 लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त; ठाणे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news