

Ambernath Crime News Kalyan Couple Case
कल्याण : कल्याणमध्ये राहणाऱ्या प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आले. अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली गावाजवळ निर्जनस्थळी दोघांचे मृतदेह आढळले असून प्रेमप्रकरणातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.
मनीष पाटील आणि विवेक पाटील हे दोघे कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहतात. शुक्रवारी दुपारी अंबरनाथममधील कुशिवली गावात या दोघांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तरुण- तरुणी हे प्रियकर आणि प्रेयसी होते. प्रेमसंबंधातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांनी आत्महत्या का केली याचा तपास हिललाईन पोलिस करत आहेत.