ठाणे; पुढारी वृत्तसेवा: एकीकडे महाराष्ट्र बंद पाळला जात असताना दुसरीकडे ठाणे महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलावाच्या ठिकाण बेवारस बॅग सापडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. ती बॅग एका दिव्यांग व्यक्तीची असल्याचे अखेर समोर आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ही घटना आज (दि. ११) रोजी दुपारी घडली.
ठाणे महापालिकेजवळील कचराळी तलाव बाजूला असलेल्या पदपथावर अज्ञात व्यक्तीने बऱ्याच वेळापासून बेवारस बॅग ठेवली आहे, अशी माहिती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात मिळाली. या माहितीनुसार प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही बॅग लोखंडी बेंचला बांधून ठेवली असल्याचे निदर्शनास आले.
बेवारस बॅगेमुळे ठाण्यात खळबळ या घटनेचा तपास सुरू असताना काही वेळात बॅगेचे मालक समीर कुमार सिंघ (वय ४५) हे तेथे आले. यानंतर समीर हे दिव्यांग आहेत. ते या परिसरात त्यांच्या नातेवाईकांची वाट पाहत हाेते. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बॅग बेंचला बांधून ते नाष्टा करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले हाेते. ही बॅग लोखंडी बेंचला बांधून ठेवली असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती पाेलिसांना दिली.
पोलीस आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपास सुरु असतानाच समीर सिंघ बॅग ठेवलेल्या ठिकाणी आले. ती बॅग समीर सिंघच्या ताब्यात देऊन पुन्हा अशी चूक करू नका, असे त्यांना बजावण्यात आल्याची माहिती कक्षाप्रमुख संतोष कदम यांनी दिली.
हेही वाचलंत का?