

लखीमपूर हिंसाचाराचा निषेध करत मविआकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय. (Maharashtra Bandh) महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मी संपर्कात आहे. राज्यात शांततेत बंद आहे. (Maharashtra Bandh) आमच्या बंदला बदनाम करण्यासाठी कुणी जर कारस्थान केलं असेल तर ते दुपारपर्यंत आमच्याकडे माहिती येईल, असे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आज सांगितले.
कर चुकवणार्यांची मोठी संख्या असताना राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या मागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा लागला आहे. राष्ट्रवादी नेत्यांच्याच मागे ईडी, सीबीआय का? असा सवाल करत हे सर्व कारस्थान राजकारणातून केलं जातं आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
पुणे : लखीमपूर घटनेतील आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र हे भाजपविरोधी राज्ये आहेत. या राज्यातचं अशी परिस्थिती निर्माण झालीय. दबावतंत्र आम्ही मान्य करणार माही, असं भाजपकडून आलेलं आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. बंदमध्ये सहभागी झाल्याबद्दल राज्यातील जनतेचे त्यांनी आभार मानले.
सोलापूर : राज्यात लखीमपूर हिंसाराच्या निषेधार्थ बंद पुकारला आहे. सोलापुरात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिलाय. केंद्रातील भाजप सरकार मनमानी कारभार करत आहे, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली.
सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. आताचं केंद्रातील मुघलांचे सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.