डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : पश्चिम डोंबिवलीतील कुंभारखाणपाडा भागात तरूणासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीवर तिच्या दोन मित्रांनी सामुहिक अत्याचार केला. रविवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. तरूणाला दारू आणण्यास पाठवून या तरूणीवर दोन्ही मित्रांनी बलात्कार केला. विष्णूनगर पोलिसांनी आतापर्यंत एकाच्या मुसक्या आवळल्या असून दुसऱ्या फरार बलात्काऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.
पीडित तरूणीचा मित्र आणि दोन्ही आरोपींची ओळख आहे. मित्राला दारू आणण्यास बाहेर पाठवून या दोन्ही आरोपींनी तरुणी घरात एकटीच असल्याची संधी साधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम डोंबिवलीतील कुंभारखाणपाडा भागात पीडित तरुणी तिच्या मित्रासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहते. गळ्यात मंगळसूत्र घालून ही तरूणी आणि तिचा मित्र पती-पत्नी प्रमाणे राहतात. ही तरूणी तिचे घर सोडण्याच्या तयारीत होती. पीडित तरूणीने तिचे घरातील सामान बांधून ते परिचत असलेल्या दिनेश गडरी याच्या घरी ठेवले होते.
रविवारी संध्याकाळी सामानाची बांधबंदिस्ती केल्यानंतर सामान कधी इतरत्र हलविणार याची चौकशी करण्यासाठी पीडितेचा मित्र दिनेश गडरी आणि सुनिल राठोड हे दोघे पीडित तरुणीने सामान ठेवलेल्या घरी आले. त्यावेळी मित्र आणि पीडित तरुणी घरात होते. पीडित तरुणी आणि तिचा मित्र अन्य ठिकाणी घरात स्थलांतरित होणार आहेत. तत्पूर्वी ओलीपार्टी करण्याची या दोघांनी इच्छा व्यक्त केली. पार्टीला पीडित तरुणीचा मित्र राजी झाला. पार्टीसाठी लागणारी दारू आणण्यास आरोपी दिनेश आणि सुनिल यांनी पीडितेच्या मित्राला सांगितले.
मित्र दारू आणण्यासाठी घराबाहेर गेला. त्यावेळी पीडित तरूणी घरात एकटीच होती. ही संधी साधून दिनेश गडरी याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दिनेशला प्रतिकार करून तरुणी घराबाहेर येऊन स्वत:च्या बचावासाठी पळू लागली. मात्र हे पाहून सुनिल याने पाठलाग करून तिला पकडले. एका रिक्षात जबरदस्तीने बसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर रिक्षातून सुनिलने पळ काढला.
या संदर्भात पीडितेच्या तक्रारीवरून विष्णूनगर पोलिसांनी सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे आणि गुन्हे प्रकटिकरण शाखेचे पोलीस निरीक्षक राहूल खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मेघा वर्मा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :