Dombivli CISF Jawan Death: डोंबिवलीतील CISF जवान बसंत सिंग यांचा प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराने मृत्यू; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

हैदराबाद येथे प्रशिक्षणावेळी आला तीव्र झटका; पश्चिम डोंबिवलीत शोककळा, भावपूर्ण अखेरचा निरोप
Dombivli CISF Jawan Death
Dombivli CISF Jawan DeathPudhari
Published on
Updated on

डोंबिवली : डोंबिवलीतून एक अत्यंत दःखद घटना समोर आली आहे. डोंबिवलीत वास्तव्यास असलेले सीआयएसएफचे जवान बसंत सिंग यांचा प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना हैदराबाद येथे घडली. देशसेवेत असताना त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक निधनाने पश्चिम डोंबिवलीतील गरीबाचा वाडा परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

Dombivli CISF Jawan Death
Thane SSC Exam Relief: अनधिकृत शाळेमुळे दहावीपासून वंचित ठरणार 11 विद्यार्थ्यांना दिलासा; ठाणे मनपाचा तातडीचा हस्तक्षेप

सीआयएसएफ अर्थात सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस बल आहे, जे देशाच्या महत्वपूर्ण उद्योग, सरकारी भवन आणि अन्य संवेदनशील स्थानांची सुरक्षा करते. सीआयएसएफचे मुख्यालय दिल्लीत आहे. त्यांचे जवान देशभरात तैनात आहेत. याच सीआयएसएफसाठी निवड झालेले बसंत सिंग हे पश्चिम डोंबिवलीतील गरीबाचा वाडा परिसरात राहत होते. ते सीआयएसएफच्या प्रशिक्षणासाठी हैदराबाद येथे गेले होते. प्रशिक्षणादरम्यान अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तातडीने वैद्यकीय मदत करण्यात आली. मात्र उपचारांदरम्यान

Dombivli CISF Jawan Death
Nevali Naka Flyover: नेवाळी नाका उड्डाणपूलाला अखेर मंजुरी; 282 कोटींच्या प्रकल्पाने वाहतूक कोंडीला दिलासा

त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव सोमवारी हैदराबादहून डोंबिवलीत आणण्यात आले. यावेळी परिसरातील रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शासकीय अधिकाऱ्यांसह स्थानिक रहिवासी, तसेच कुटुंबीय आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dombivli CISF Jawan Death
Kalyan Dombivli Metro Project: कल्याण-डोंबिवलीत मेट्रो कामाचा फटका; वाडेघर रिंगरूटवर गर्डर यार्डमुळे वाहतूक कोंडी

जवानाला अखेरचा निरोप

देशसेवेत कार्यरत असलेल्या जवानाला अखेरचा निरोप

देताना वातावरण भावूक झाले होते.

बसंत सिंग यांच्या पश्चात

पत्नी, आई-वडील आणि दोन

मुले असा परिवार आहे. सिंग कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

कोसळला आहे. त्यांच्या जाण्याने

ते राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे.

देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या या जवानाला सर्व स्तरांतून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news