Chendani Koliwada Redevelopment: राजकीय गणितासाठी गावठाणाचा बळी?

ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्यात भूमिपुत्रांचा संताप; पुनर्विकासाच्या नावाखाली हक्कांवर गदा
Chendani Koliwada Redevelopment
Chendani Koliwada RedevelopmentPudhari
Published on
Updated on

ठाणे : ठाणे पूर्वेतील चेंदणी कोळीवाडा परिसरात सुरू असलेल्या प्रस्तावित विकास योजनांमुळे स्थानिक कोळी समाजात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. पिढ्यान्‌‍पिढ्या वास्तव्यास असलेल्या या गावठाणात झोपडपट्टी पुनर्विकास आणि क्लस्टर डेव्हलपमेंटसारख्या योजनांच्या नावाखाली मूळ रहिवाशांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप कोळी बांधवांकडून केला जात आहे.

Chendani Koliwada Redevelopment
Illegal foreign nationals Navi Mumbai: विदेशी नागरिकांचे अवैध वास्तव्य ठरणार धोक्याचे

चेंदणी कोळीवाडा हा ठाणे शहरातील मूळ कोळी समाजाचा पारंपरिक गावठाण परिसर आहे. मात्र महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत असलेले विस्तारित गावठाणाचे कायदेशीर हक्क आजही प्रत्यक्षात लागू झालेले नाहीत. परिणामी अनेक कुटुंबांना अतिक्रमणधारक ठरवले जात असून, त्यांच्या घरांवर अनिश्चिततेचे सावट आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांनुसार या गावठाण भागात झोपडपट्टी पुनर्विकास लागू होऊ शकत नाही. असे असतानाही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही राजकीय घटकांकडून दिशाभूल करणारी आश्वासने दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे समाजात संभ्रम, तणाव आहे.

Chendani Koliwada Redevelopment
Ward 26 BJP Campaign: मंत्री राणे–सामंतांच्या सभेने वॉर्ड 26 चे राजकीय समीकरण बदलले

सध्याच्या विकास आराखड्या- नुसार कोळीवाडा परिसरावर शहरातील इतर नागरी भागांप्रमाणेच नियम लागू केले जात आहेत. याचा थेट परिणाम घरांच्या दुरुस्ती, पुनर्बांधणी व मूलभूत विकासावर होत आहे. त्यामुळे कोळीवाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली जाहीर करावी, अशी मागणी समन्वयक सचिन ठाणेकर यांनी केली आहे.

Chendani Koliwada Redevelopment
Mumbai news: मढ कोळीवाड्यात नौकेसह मासेमारी साहित्याला भीषण आग; कोळी बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान

पारंपरिक घरे सरसकट झोपडपट्टी म्हणून गणली

विस्तारित गावठाण भागातील अनेक पारंपरिक घरे सरसकट झोपडपट्टी म्हणून वर्गीकृत केली जात असल्याचा आरोप आहे. मालमत्ता पत्रक देण्याऐवजी पुनर्विकासाच्या नावाखाली विस्थापनाचा मार्ग मोकळा केला जात असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. नवी मुंबईतील कोळीवाड्यांप्रमाणेच चेंदणी कोळीवाड्यालाही न्याय असे समन्वयक आनंद कोळी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news