

मुंबई : मागाठाणे विधानसभेतील भाजपा - शिवसेना - आरपीआय महायुतीच्या वॉर्ड क्रमांक 26 च्या उमेदवार प्रीतम पंडागळे यांच्या प्रचारार्थ बुधवार उद्योगमंत्री उदय सामंत, मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे, आणि भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या सिंग इस्टेटमध्ये झालेल्या जाहीर सभेनंतर वॉर्ड 26 मधील वातावरण बदलले आहे. शनिवारी त्यांच्या प्रचारावेळी नागरिकांची उत्स्फूर्त गर्दी दिसून आली.
शनिवारी भाजपा उमेदवार प्रितम पंडागळे यांच्या प्रचारार्थ सिंग इस्टेट रोड नंबर पाच ते झिरोपर्यंत निघालेल्या प्रचार यात्रेत सुप्रसिद्ध भोजपुरी कलाकार तथा भाजपा नेते दिनेश लाल यादव (निरहुआ), माजी नगरसेवक ठाकूर सागर सिंग, अविनाश राय आणि अनिरुद्ध तिवारी पृथ्वी पाल आदींची उपस्थिती होती. अभिनेता दिनेश लाल यादव यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यादव यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाजपा उमेदवार प्रीतम पंडागळे यांना मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले.
या प्रचार यात्रेत सिंग इस्टेट रोड नंबर 2 येथील सिंग इस्टेट रहिवासी संघाचे पदाधिकारी पाडुरंग धायगुडे, रत्नाकर मयेकर, चव्हाण साहेब यांनी भाजपा उमेदवार प्रीतम ताई पंडागळे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे स्वागतही केले.
सिंग इस्टेटमधील सभेला मतदार जनतेसोबतच कार्यकर्त्यांचे मोहोळच जमले होते. मंडळ अध्यक्ष अविनाश राय, सचिन नांदगावकर, अमर पन्हाळकर, समाजसेवक विजय साळवी, वंदना नांदगावकर, राजा जाधव, अनिरुद्ध तिवारी, मिलिंद पालांडे, अर्चना गुंजाळ, गोविंद म्हस्के, मयूर पंडागळे, प्रमोद तळेकर, राकेश चवाथे, उत्तम उघडे, रईस शेख,अजय नर्से, रंजन म्हसकर, अनिल केसकर,
प्रमोद तळेकर, मंगेश त्रिलोटकर, सुरेखा नरवडे, मिना गुप्ता, मंजुनाथ हेगडे, सोनु तिवारी, अर्चना मंडळ, कुसुम पवार, रामचंद्र दास, सुनिल गुप्ता, पंकज सिंग, सोनु विश्वकर्मा, रणजित यादव, सुरेश प्रजापती, रोशन प्रजापती, मनोज कनोजिया, रंजना कनोजियासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने वॉर्ड क्रमांक 26 मधील नागरिक उपस्थित होते.