Illegal foreign nationals Navi Mumbai: विदेशी नागरिकांचे अवैध वास्तव्य ठरणार धोक्याचे

तळोजा व खारघरमध्ये पोलिसांची धडक कारवाई; खोलीमालकांवर थेट गुन्हे
Police
Police Pudhari
Published on
Updated on

खारघर : पनवेल नवी मुंबईत बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असून, त्यांना आश्रय देणाऱ्या खोलीमालकांवर थेट गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेतली आहे.

Police
Mahad Municipal Committee Election: नपा सभापती निवडींची उत्सुकता

शुक्रवारी एकाच दिवशी तळोजा आणि खारघर या दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत परदेशी नागरिकांची माहिती लपविल्याप्रकरणी खोलीमालकांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले. या कारवाईमुळे बेकार्यदेशीर वास्तव्य करणारे परदेशी नागरिक तसेच त्यांना आश्रय देणाऱ्या मालकांचे धाबे दणाणले आहेत.

Police
Makar Sankranti Market Raigad: रायगडच्या बाजारपेठांना लागले संक्रांतीचे वेध

परदेशी नागरिक कायदा 1946 मधील कलम 14 (क) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेक्टर 10 मधील पार्वती हाइट्स या इमारतीत शुक्रवारी सकाळी सात वाजता करण्यात आलेल्या तपासणीत ही बाब उघडकीस आली.

इमारतीतील खोली क्रमांक 501 मध्ये 35 आणि 42 वर्षांचे दोन परदेशी नागरिक वास्तव्यास असल्याचे आढळले. या नागरिकांना भाडेकरू म्हणून ठेवताना खोलीमालकाने केंद्र सरकारच्या परदेशी नागरिकांसाठी असलेल्या संकेतस्थळावर सी-फॉर्मद्वारे नोंदणी न केल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे खोलीमालकाने बेकायदेशीर आश्रय देण्यास मदत केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी गन्हा दाखल केला आहे.

Police
JNPT Freight Corridor: देशाच्या रेल्वे मालवाहतुकीला येणार गती

नागरिकांसाठी असलेल्या संकेतस्थळावर सी-फॉर्मद्वारे नोंदणी न केल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे खोलीमालकाने बेकायदेशीर आश्रय देण्यास मदत केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याच दिवशी खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशीच कारवाई करण्यात आली.

सेक्टर 35 एफमधील ड्रीम सफायर इमारतीतील दोन सदनिका परदेशी नागरिकांना भाड्याने देण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. चौकशीअंती या सदनिकांमध्ये चार परदेशी नागरिक राहत असल्याचे निष्पन्न झाले. मात्र संबंधित खोलीमालकांनी त्याबाबतची माहिती पोलिसांना किंवा अधिकृत यंत्रणांना दिली नसल्याचे समोर आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news