Central Railway : मध्‍य रेल्वेच्या १८ लोकल फेऱ्यांचे पंधरा डब्यात रूपांतर होणार

लोकल १५ नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत; कसारा मार्गावरील प्रवाशांना दिलासा
Central Railway
Central Railwaypudhari photo
Published on: 
Updated on: 

खडवली : मनोज ताठे

मध्‍य रेल्वेच्या १८ लोकल फेऱ्यांचे पंधरा डब्यात रूपांतर करण्‍यात येणार असून यामुळे कसारा मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मुंबई-कसारा मार्गावरील लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मध्य रेल्वेने १२ डब्यांच्या आणखी १८ लोकल फेऱ्यांचे १५ डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करण्याचे नियोजन केले आहे. या लोकल १५ नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती आहे.

या निर्णयामुळे नव्या लोकल फेऱ्या न वाढवता प्रत्येक फेरीची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता सुमारे २५ टक्क्यांनी वाढणार आहे. सध्या गर्दीच्या वेळेत कसारा, आसनगाव, आटगाव आणि टिटवाळा परिसरातील प्रवाशांना लोकलमध्ये चढताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे अधिक डब्यांच्या लोकल सुरू झाल्यास प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Central Railway
Mumbai University : मुंबई विद्यापीठाकडून बौद्ध भन्तेंचा पदव्युत्तर प्रवेश रद्द

मध्य रेल्वेने यापूर्वी १२ डब्यांच्या २२ लोकल फेऱ्यांचे १५ डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर केले होते. त्यामुळे १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या ३२ वरून ५४ झाली. आता आणखी १८ फेऱ्यांचे रूपांतर झाल्यानंतर ही संख्या ७२ पर्यंत पोहोचणार आहे.

टिटवाळा स्थानकात फलाटाचा विस्तार

१५ डब्यांच्या लोकल चालविण्यासाठी टिटवाळा स्थानकात फलाटाचा विस्तार, सिग्नल यंत्रणेतील बदल तसेच रेल्वे रुळ आणि विद्युत तारांशी संबंधित कामे करण्यात आली आहेत. नव्या लोकलचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे कसारा मार्गावरील चाकरमान्यांची गर्दी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

Central Railway
Jio Platforms IPO Record : जिओचा आयपीओ ठरला ऐतिहासिक; विश्वविक्रमी १ कोटींपेक्षा जास्त अर्ज

प्रवाशांच्या मागणीला यश

सध्या १५ डब्यांच्या या फेऱ्या अनियमित असून, तब्बल सात तासांनी या फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे. एकूण फेऱ्यांमध्ये वाढ केली नसल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पासून कर्जत, अंबरनाथ आणि बदलापूरपर्यंत देखील प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना किरकोळ दिलासा मिळणार आहे. प्रवासी संघटनांकडून गेली अनेक वर्षे १५ डब्यांच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी करण्यात येत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news