Mumbai University : मुंबई विद्यापीठाकडून बौद्ध भन्तेंचा पदव्युत्तर प्रवेश रद्द

आठ वर्षांत पीएचडी पूर्ण न केल्याचा विद्यापीठाचा दावा
Mumbai University PG Admission Cancelled
Mumbai Universitypudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात विविध मागण्यांसाठी आठ महिन्यांहून अधिक काळ आंदोलन करणारे बौद्ध भन्ते राजेश बलखंडे ऊर्फ भदंत विमंस यांचा २०२६-२७ या वर्षातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रवेश विद्यापीठाने रद्द केला.

मुंबई विद्यापीठात आंबेडकर अभ्यास या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी बनते बलखंडे यांनी प्रवेश घेतला होता. हा प्रवेश रद्द करण्याचा निर्णय १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी त्यांना निर्णयाची माहिती देण्यात आली. या कारवाईमुळे विद्यापीठ प्रशासन आणि भन्ते बलखंडे यांच्यात पुन्हा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

Mumbai University PG Admission Cancelled
Jio Platforms IPO Record : जिओचा आयपीओ ठरला ऐतिहासिक; विश्वविक्रमी १ कोटींपेक्षा जास्त अर्ज

प्रवेश रद्द करण्याच्या निर्णयावर भन्ते बलखंडे यांनी आक्षेप घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशात नवीन अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास किंवा विद्यापीठाच्या परिसरात येण्यास बंदी घालण्यात आलेली नाही, असा दावा त्यांनी केला आहे. प्रवेश रद्द करून विद्यापीठाने आपल्या शिक्षणाच्या अधिकारावर गदा आणली असून, कायद्याचेही पालन केलेले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. या निर्णयाबाबत कुलगुरूंकडे स्पष्टीकरण मागितले असून, त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा असल्याचेही त्यांनी एका निवेदनात स्पष्ट केले.

भन्ते बलखंडे यांनी एप्रिलमध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कलिना परिसरातील आंदोलन मागे घेतले होते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार आठ वर्षांच्या निर्धारित कालावधीत पीएचडी पूर्ण न करू शकलेल्या अनेक विद्यार्थ्यांची नोंदणी रद्द करण्यात आली होती. त्यामध्ये बलखंडे यांचाही समावेश होता. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विद्यापीठ परिसरात आंदोलन केले होते. यानंतर आता विद्यापीठ प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयाच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवेश रद्द करण्याच्या निर्णयावरून विद्यापीठ प्रशासन आणि भन्ते बलखंडे यांच्यात मतभेद कायम असल्याचे दिसत आहे.

Mumbai University PG Admission Cancelled
Sunday Mega Block Mumbai : मध्य, हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक

भन्ते बलखंडे २००५ पासून विद्यापीठाशी संबंधित आहेत. या काळात त्यांनी विद्यार्थी, विविध विभाग, वसतिगृह प्रशासन, संशोधन मार्गदर्शक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी केल्या. त्यांच्या आंदोलनांमुळे विद्यापीठातील शैक्षणिक वातावरणावर परिणाम झाल्याचा दावा प्रशासनाचा आहे.एकीकडे हायकोर्टाच्या आदेशाचा व व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयाचा आधार घेत विद्यापीठाने प्रवेश रद्द केल्याचे सांगितले आहे, तर दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशात नवीन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास बंदी नसल्याचा दावा भन्ते बलखंडे यांनी केला आहे. २० मे रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत भन्ते बलखंडे, तुषार मिश्रा व शशिकांत जगताप यांच्या वर्तनासंदर्भात त्यांना नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news