Jio Platforms IPO Record : जिओचा आयपीओ ठरला ऐतिहासिक; विश्वविक्रमी १ कोटींपेक्षा जास्त अर्ज

इश्यू बंद होण्यास काही तास शिल्लक असतानाच हा अभूतपूर्व विक्रम
Jio Platforms IPO Record
Jio Platforms IPO Recordpudhari photo
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचा आयपीओ (IPO) भारतीय शेअर बाजार आणि जागतिक इतिहासात एक नवा सुवर्णअध्याय रचत आहे. कोणत्याही कंपनीच्या आयपीओमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक अर्ज प्राप्त होत या इश्यूने तब्बल १ कोटी अर्जांचा टप्पा पार केला आहे. इश्यू बंद होण्यास काही तास शिल्लक असतानाच हा अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित झाला आहे.

यापूर्वी हा जागतिक विक्रम ‘वारी एनर्जीज’च्या नावावर होता, ज्यांना सुमारे ९७ लाख अर्ज मिळाले होते. तसेच बजाज हाऊसिंग फायनान्स आणि बीसीसीएल यांसारख्या प्रमुख कंपन्यांच्या आयपीओला सुमारे ९० लाख अर्ज मिळाले होते; मात्र या सर्व विक्रमांना मागे टाकत जिओ प्लॅटफॉर्म्सने १ कोटींहून अधिक अर्जांचा टप्पा ओलांडणारा जगातील पहिला आयपीओ ठरण्याचा बहुमान मिळवला आहे.

Jio Platforms IPO Record
केवळ आरोपाच्या गांभीर्यावर अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवता येणार नाही

धीरूभाई अंबानी यांच्या वारशाचा वारू आणि मुकेश अंबानी यांचे सामान्यांपर्यंत संपत्ती निर्मिती पोहोचवण्याचे तसेच भारतीय गुंतवणूकदारांना सक्षम करण्याचे दूरदर्शी स्वप्न यातून सत्यात उतरत असल्याचे दिसून येते.

या अभूतपूर्व प्रतिसादाने गुंतवणूकदारांचा जिओ प्लॅटफॉर्म्सवरील आत्मविश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत चाललेल्या या अंतिम बीडिंग प्रक्रियेमुळे हा आकडा आणखी वर जाण्याची आणि एका नवीन जागतिक विक्रमाची नोंद होण्याची शक्यता आहे.

Jio Platforms IPO Record
Sunday Mega Block Mumbai : मध्य, हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news