IVF Racket: बदलापूर स्त्रीबीज विक्री प्रकरणात डॉक्टर अमोल पाटील अटकेत; नाशिकमधून पोलिसांची कारवाई

मालती आयव्हीएफ सेंटरचा सहभाग उघड; 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, आणखी आयव्हीएफ केंद्रांवर कारवाईची शक्यता
IVF
IVFPudhari
Published on
Updated on

बदलापूर : बदलापुरातील स्त्री बीज विक्री प्रकरणात मालती आयव्हीएफ सेंटरचा डॉक्टर अमोल पाटील याला बदलापूर पूर्व पोलिसांनी नाशिक येथे जाऊन बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी त्याला अटक केली असून बुधवारी चिखलोली येथील न्यायालयात हजर केले असता त्याला 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

IVF
बीजांड बेकायदेशीर विक्रीप्रकरणी मोक्का लावण्याचा विचार; राज्यमंत्री योगेश कदम

बदलापूर स्त्री बीज विक्रीचं रॅकेट उघड झाल्यानंतर यात नाशिक येथील मुंबई नाका परिसरात असलेल्या मालती आयव्हीएफ आणि एआरटी सेंटरचा सहभाग असल्याचा पहिल्यांदाच तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकले होते. नाशिक येथे असलेल्या परवान्याचा गैरवापर करत या डॉ.अमोल पाटीलने ठाणे येथेही आयव्हीएफचे एक सेंटर एका ब्लॉकमध्ये उघडून त्या ठिकाणी महिलांवर उपचार सुरू केले होते.

IVF
Badlapur Railway Station: बदलापूर रेल्वे स्थानकात महिलेला शौचालय नाकारल्याने संताप; ठिय्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल

आणि त्या ठिकाणीच बदलापुरातील स्त्री बीज विक्रीच्या रॅकेटचे धागेदोरे पोलिसांना आढळले होते. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर हे धागेद्वारे नाशिकपर्यंत गेले. नाशिकच्या महापालिकेतील आरोग्य विभागाने यापूर्वी मालती आयव्हीएफ सेंटरला नोटीस दिली होती. कागदपत्रांमध्ये असलेल्या

IVF
Kalyan Dombivli Mobile Tower: कल्याण-डोंबिवलीत चौकांमध्ये मोबाईल टॉवर उभारणीवरून वाद; शंकरराव चौकातील झाडतोडीने संताप

अनियमितत्ता आणि यापूर्वी बदलापूर अटक झालेल्या आरोपींचे विविध गोष्टींद्वारे झालेल्या संभाषण आणि पुराव्याच्या आधारे डॉ.अमोल पाटील याला अटक करण्यात आली आहे. अमोल पाटील हा या प्रकरणात आरोप अटक झालेला पहिलाच डॉक्टर असून या प्रकरणात आणखीन काही आयव्हीएफ आणि एआरटी सेंटरवर कारवाई होते का, हे पहा महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news