डोंबिवलीतील ९ पोलिसांना कोरोनाची लागण | पुढारी

डोंबिवलीतील ९ पोलिसांना कोरोनाची लागण

ठाणे : पुढारी वृत्तसेवा
डोंबिवलीत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. डोंबिवलीत कर्तव्यावर असणाऱ्या 9 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये दोन अधिकारी तर सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी कोरोनाचे १ हजार २० रुग्ण आढळले. ३२ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले. 4 हजार 55 रुग्णांवर सुरू आहेत उपचार असून, दिलासादायक बाब म्‍हणजे, आतापर्यंत 1 लाख 42 हजार 673 रुग्णांना कोरोनावर मात केली आहे.

डोंबिवली हद्दीतील ९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यामध्ये २ अधिकारी व ७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. डोंबिवली पोलिस ठाण्यातील १ अधिकारी व ४ कर्मचारी, मानपाडा पोलिस ठाण्यातील १अधिकारी व २ कर्मचारी व विष्णूनगर पोलिस ठाण्यातील 1 कर्मचाऱ्याचा समावेश असल्याची माहिती डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त जय मोरे यांनी दिली.

हेही वाचलं का ?

Back to top button