kdcc bank : ‘लोकल’ अदानी-अंबानी यांनी केला ’करेक्ट’ कार्यक्रम

kdcc bank : ‘लोकल’ अदानी-अंबानी यांनी केला ’करेक्ट’ कार्यक्रम
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत टोकाची ईर्ष्या, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे निवडणूक चांगलीच चर्चेत आली होती. शुक्रवारी निवडणुकीचा निकाल लागताच लोकल अदानी आणि अंबानी यांनी केलेल्या 'करेक्ट' कार्यक्रमाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. (kdcc bank)

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील टोकाला पोहोचलेली ईर्ष्या पाहता आज काही गटांत धक्कादायक निकाल लागले. निवडणुकीत प्रकाश आवाडेंसह अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला.

या निकालानंतर 'तो पत्ता करतो गुल, आमचा नेता हाय लय पावरफुल्ल…' असे स्टेटस शेअर करत कार्यकर्त्यांचा सोशल मीडियावर जल्लोष पाहायला मिळाला. तसेच विजयी नेत्यांचे फोटो, व्हिडीओ, मीम्स अनेकांच्या सोशल मीडियावर झळकत होते.

कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यांचे, गटाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याची स्पर्धाच रंगली होती. आपल्या नेत्याला, आघाडीला गुलाल लागताच पैजा जिंकल्याचा जल्लोष कार्यकर्त्यांकडून व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर शेअर केला जात होता.

kdcc bank : कारचा नंबर आणि मतांची चर्चा

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील पाटील-यड्रावकर यांच्या कारच्या नंबरची सुरुवात 98 पासून होते आणि त्यांचा विजयही 98 मतांनी झाला आहे. या योगायोगाची चर्चा देखील सोशल मीडियावर सुरु होती.

नेत्यांनी विश्वासघाताने सुरुंग लावला

'जिल्ह्यातील नेत्यांनी विश्वासघाताने सुरुंग लावला. सत्तारूढ आघाडीचे सर्व नेते प्रामाणिक राहिले असते तर त्या तीनही जागा जिंकलो असतो…' निकालानंतर विनय कोरे यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेचे मीम्स तयार करून इन्स्टाग्रामवर शेअर केले जात होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news