कोकणात आमच्यासमोर कुणी लढला तरी विजय आमचाच : संजय राऊतांचे राणेंना आव्हान | पुढारी

कोकणात आमच्यासमोर कुणी लढला तरी विजय आमचाच : संजय राऊतांचे राणेंना आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोकणात आमच्यासमोर कुणी लढला तरी विजय आमचाच असा ठाम विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. नारायण राणे यांच्या उमेदवारीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले, हुकूमशाहीचा पराभव करणं आमचं ध्येय आहे. कोणत्याही क्षणी लोकसभा जाहीर होईल. शरद पवार तुतारींच्या माध्यमातून विरोधकांना चेतावणी देणार. शिवराय युद्धाला जाताना तुतारी फुंकून विरोधकांना चेतावणी दिली जायची. आता जनता हातात मशाल घेऊन तुतारीच वाजवणार. नड्डांनी अजितदादा, शिंदेंना कमळावर लढण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांना चिन्ह मिळं तरी मतं मिळणार नाहीत हे नड्डांना माहिती आहे. फुटलेल्या चिन्हांवर निवडणूक लढण्याचं भाजपचं धाडस नाही.

Back to top button