Manoj Jarange -Patil: सरकारला जातीय दंगली घडवायच्या आहेत का ? : मनोज जरांगे- पाटील

 संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

ठाणे: पुढारी वृत्तसेवा : घटनात्मक पदावर बसणाऱ्यांकडूनच जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य केली जात आहेत. कायदा पायदळी तुडवला जात आहे. दुसरीकडे शांतता राहावी, म्हणून मराठा समाज मात्र रात्रंदिवस झटत असतानाही आमच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत. अशा प्रकारे जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना पाठबळ देऊन सरकारला राज्यात जातीय दंगली घडवून आणायच्या आहेत का ? असा आरोप मनोज जरांगे- पाटील यांनी आज (दि.२१) येथे केला. Manoj Jarange -Patil

ते ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात आयोजित जाहीर सभेत बोलत होते. अंतरवलीला पोहोचण्याआधी आरक्षण संदर्भातील टाइमबॉण्ड द्या, आमच्यावर टाकण्यात आलेल्या केसेस मागे घ्या, येत्या अधिवेशात आरक्षणासंदर्भातील अध्यादेश काढा, अशा मागण्या यावेळी जारांगे पाटील यांनी केल्या. Manoj Jarange -Patil

या सभेत जरांगे- पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांना लक्ष केले. ओबीसींचे आरक्षण आम्ही घेतच नाही. मंडल कमिशनने त्यांना आरक्षण दिले आहे. आमच्या नोंदी सापडल्या आहेत. तर आम्हाला आरक्षण का दिले जात नाही. आम्हाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसी आरक्षण पाहिजे. लोकसंख्येप्रमाणे आम्हाला आरक्षण मिळावे, ही आमची मागणी असल्याचे जरांगे -पाटील म्हणाले.

छगन भुजबळांचा बोलवतां धनी कोणी नाही, असे वाटत होते. पण एवढं बोलून त्यांच्यावर कारवाई होत नाही म्हणजे आता शंका येत आहे. त्यांच्या पाठिशी कोण आहे का ?, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. ओबीसींना आरक्षण का दिले, असे आम्ही कधीच बोललो नाही. मात्र, भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोध केला म्हणून आम्ही त्यांना विरोध केला असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाज आणि ओबीसी हे भावाप्रमाणे आहेत, एक सोडून सर्वच ओबीसी नेत्यांचा यामध्ये संबंध नाही. त्यामुळे मंत्रिमंडळातील एक मंत्री सोडून मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाला आरक्षण देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Manoj Jarange -Patil  सरकारशी सेटलमेंट करण्यासाठी आंदोलन केलेले नाही

मनोज जरांगे- पाटील यांच्या मागे कोण आहे ?, हे लवकरच समजेल, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना जरांगे- पाटील यांनी माझ्या मागे कोण असेल. तर कृपया आम्हाला त्याचे नाव सांगावे, आम्ही त्यांना बाहेर काढू, मात्र माझ्या मागे केवळ माझा मराठा समाजच असून सरकारशी सेटलमेंट करण्यासाठी मी आंदोलन केले नसल्याचे त्यांनी सांगितले. माझा जीव गेला तरी तत्वाशी तसूभरही मागे हटणार नाही, अशी ग्वाही त्यांनी मराठा समाजाल दिली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news