Manoj Jarange -Patil : सरसकट मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळवून देणारच : मनोज जरांगे- पाटील

Manoj Jarange -Patil : सरसकट मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळवून देणारच : मनोज जरांगे- पाटील

कुरुंदा, पुढारी वृत्तसेवा : इंचभरही माझी नियत ढळू न देता मराठा समाजासाठी गद्दारी करणार नाही, मी खानदानी मराठा आहे. उपोषण सोडण्याची विनंती करण्यासाठी आलेल्या प्रत्येक मंत्र्यांना मी सांगत होतो की, जे काही तुम्हाला सांगायचे ते येथेच सर्वांसमोर सांगा. माझ्या कानात नको. महाराष्ट्रातील मराठ्यांना तसेच मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी मराठा आरक्षण द्या. मी आरक्षण मिळवून देणारच आहे, परंतु त्यासाठी सर्व मराठा बांधवांनी एकजूट होणे गरजेचे आहे, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी आज (दि.२) येथे केले. (Manoj Jarange -Patil)

मनोज जरांगे- पाटील यांची मराठा आरक्षणासाठी कुरूंद्यात आज जाहीर सभेचे आयोजन येथील उपबाजार पेठ समितीच्या प्रांगणात करण्यात आले होते. यावेळी स्मशानभूमीत उपोषणाकरिता बसलेल्या सात जणांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर ते जाहीर सभेत बोलत होते. (Manoj Jarange -Patil)

मी मराठा समाजासाठी आरक्षण मिळवून देण्यासाठी लढत आहे. मला कशाची गरज किंवा अपेक्षा नाही. माझ्या समाजाच्या मुलांचे शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी जे बेहाल होत आहेत, ते पाहावत नाही. एका टक्क्यांनीही शिक्षणाची व नोकरीची संधी हुकली. त्यावेळी माझ्या मराठा समाजाला काय वेदना होतात, हे आता आपल्याला समजायला लागले आहे. मी महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील मराठा बांधवांना सरसकट आरक्षण मिळवून देऊन मराठ्यांना विजयी करणार आहे.

यावेळी हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमासाठी आलेल्या मराठा बांधवांना पिण्याच्या पाण्याची, वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुरूंद्यासह चोंडी आंबा, कोर्टा, वाई, पिंपराळा, वरताळा, दाभडी, कोठारी, पार्डी बुद्रुक, पार्डी खुर्द, गिरगाव, वसमत, महागाव आदी गावातील नागरिकांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news