आरटीईअतंगर्त विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत मोफत शिक्षण द्या, राहुल भंडारे यांची पालकमंत्री चद्रकांत पाटलांकडे मागणी | पुढारी

आरटीईअतंगर्त विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत मोफत शिक्षण द्या, राहुल भंडारे यांची पालकमंत्री चद्रकांत पाटलांकडे मागणी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार आरटीईअंतर्गत विद्यार्थांना देण्यात येणारे मोफत शिक्षण १२ पर्यंत करण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक राहुल भंडारे यांनी पालकमंत्री चद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

बालकांचे मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारान्वे आरटीईअंतर्गत आठवीपर्यंत मोफत शिक्षण देण्यात येत आहे. प्रामुख्याने या कायद्याअंतर्गत कष्टकरी, कचरा वेचक, झोपडपट्टीधारक, धुणे भांड्यांची कामे करणाऱ्या कुटुंबातील मुले मुली मोठ्या प्रमाणात आहेत.आठवीनंतर आपल्या पाल्याचा शैक्षणिक खर्च भागविणे त्यांना अत्यंत जिकारीचे असते. त्यामुळेच आरटीईअंतर्गत देण्यात येणारे मोफत शिक्षण हे १२ वी पर्यंत करावे, अशी मागणी भंडारे यांनी माजी खासदार संजय काकडे यांच्यासमवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. आपल्याकडे प्रभागातील तसेच संपूर्ण पुणे शहरातील अनेक पालकांनी अशा स्वरूपाची मागणी केल्याची माहितीही भंडारे यांनी दिली. त्यावर पालकमंत्री पाटील यांनी ही महत्वाची मागणी असल्याने त्यावर उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन कार्यवाही करू असे आश्वासन दिले. सदर मागणी या मागणीचे निवेदन शिक्षण अधिकारी व मनपा आयुक्त यांनाही देण्यात आले आहे.

हेही वाचा:

पुणे: ज्येष्ठ कबड्डी संघटक शंकर ढमाले यांचे निधन

पुणे : शेंगदाणा अन् तेलही महागले; घ्या जाणून आजचे दर

पुणे : अतिवृष्टीमुळे फळभाज्या कडाडल्या! किलोचा भाव शंभरी पार

 

Back to top button