पुणे : शेंगदाणा अन् तेलही महागले; घ्या जाणून आजचे दर

पुणे : शेंगदाणा अन् तेलही महागले; घ्या जाणून आजचे दर

पुणे : आवक कमी असल्यामुळे शेंगदाण्याची दरवाढ सुरूच असून गेल्या आठवड्यातही दरात आणखी वाढ झाली. याखेरीज, बाजारात शेंगदाणा तेलाचे दरही कडाडले आहेत. मागणीअभावी तुरडाळ, हरभराडाळ आणि उडीदडाळीच्या दरात क्विंटलमागे दोनशे रुपयांनी घट झाली. आवक जावक साधारण असल्यामुळे अन्नधान्ये, साखर, गूळ या जिनसांचे दर स्थिर होते.

गुजरातमध्ये बर्‍याच भागात अतिवृष्टी झाली असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्याचे वृत्त आहे. भूईमूग शेंगेच्या पिकाला फटका बसला असून तिळाचे पीक भूईसपाट झाले आहे. यामुळे शेंगदाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून दरात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी, शेंगदाणा तेलाचे दरही कडाडले आहेत. युक्रेनमधून येणार्या सुर्यफूल तेलाच्या आयातीवर परिणाम झाला आहे.

यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही सुर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. येथील घाऊक बाजारातही शेंगदाणा तेलाचे दर 15 किलोच्या डब्यामागे 50 ते 75 रुपयांनी वाढले आहेत. सुर्यफूल तेलाच्या दरातही 15 लिटरच्या डब्यामागे 25 रुपयांनी वाढ झाली. सणासुदीचा हंगाम सुरु होत असल्यामुळे यामुळे खाद्यतेलांस मागणी चांगली राहील, असा अंदाज आहे.

बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी लागू

तांदळाची दरवाढ रोखण्याकरिता केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मात्र ऊकडा आणि स्टीम तांदळाची निर्यातीवर बंधने नसल्यामुळे या तांदळाची निर्यात सुरुच राहाणार आहे. या निर्णयाचा बाजारावर तूर्त कसलाही परिणाम झालेला नाही, असे सांगण्यात आले. आवक जावक कमी असल्यामुळे गेल्या आठवडयातही गूळ आणि साखरेच्या दरात कोणताही बदल आढळला नाही. सध्या सण उत्सव नसल्यामुळे मागणी कमी आहे. यामुळे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रती क्विंटलचा दर 3775 ते 3825 रुपये होता.

शेंगदाण्याची दरवाढ सुरुच

तुटवडयामुळे शेंगदाण्याची दरवाढ सुरुच आहे. गेल्या आठवडयातही येथील घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या शेंगदाण्याचे दर क्विंटलमागे 200 ते 400 रुपयांनी वाढले. सध्याचे दर ही या वर्षातील सर्वाधिक मानण्यात येत आहेत. आगामी सणासुदीच्या काळात शेंगदाण्यास मागणी अधिक असते. पुरवठा स्थिती सुधारली नाही तर दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. आवक जावक साधारण असल्यामुळे साबुदाणा, भगर, मिरची, नारळ, गोटा खोबरे या जिनसांचे दर स्थिर होते. पोह्यांमधील तेजी कायम असून, मागणी साधारणच असल्याचे सांगण्यात आले.

डाळींच्या दरात घसरण

तुरीची आयात सुरू झाली असून, आगामी काळात मोठया प्रमाणात आयात अपेक्षित आहे. यामुळे तुरडाळीच्या दरातील तेजी थांबून घसरण सुरू झाली आहे. गेल्या आइवडयात दरात क्विंटलागे दोनशे रुपयांनी घट झाली. राज्य सरकारने नाफेडमार्फत 55 ते 60 रुपये किलो दराने हरभरा डाळीची विक्री सुरु केली आहे, यामुळे हरभराडाळीचे दरही मंदीकडे झुकले असून दरात 100 रुपयांनी घट झाली. मागणीर कमी झाल्यामुळे उडीदडाळीच्या दरातही किंवटलमागे 200 ते 300 रुपयांनी घट झाली. मात्र तुटवडयामुळे हिरव्या वाटाण्याचे दर क्विंटलमागे 500 ते 700 रुपयांनी वाढल्याचे सांगण्यात आले.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल) : 3775 ते 3825 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर): शेंगदाणा तेल 2800-2900, रिफाईंड तेलः 2550-3250, सरकी तेल 1480-1700, सोयाबीन तेल 1480-1700, पामतेल 1400-1550, सूर्यफूल रिफाईंड तेल 1480-1700, वनस्पती तूप 1500-2000, खोबरेल तेल 2100 रु. तांदूळ : गुजरात उकडा 3200-3500, मसुरी 3000-3500, सोनामसूरी 4000-4500, एच.एम.टी. कोलम 4500-5000, लचकारी कोलम 5500-6000, चिन्नोर 4500-5000, 1121-10000-11000, आंबेमोहोर (सुवासिक) 8000-8500, बासमती अखंड 11500-12000, बासमती दुबार 8500-9000, बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5000, बासमती कणी 3200-3500, 1509-8000-8500, इंद्रायणी 4500-5000 रु. गहू : सौराष्ट्र लोकवन नं. 1 3700-4000, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3400-3600, एम.पी. लोकवन नं.1 3600-3800, नं.2 3400-3600, सिहोर 4800-5800, सिहोरी 3400-3800, मिलबर 2600-2650 रु. ज्वारी : गावरान नं. 1- 5500-6000, गावरान नं. 2-5000-5400, नं. 3 4500-4800, दूरी 3800-4200 रु. बाजरी : महिको 3200-3800, गावरान 3200-3500, हायब्रीड 3000-3200 रु. गूळ : गूळ एकस्ट्रा 4150-4350, गूळ नं. 1 4000-4100, गूळ नं. 2 3850-3950, गूळ नं.3 3700-3825 बॉक्स पॅकिंग 3700-4800 रु. डाळी : तूरडाळ 12000-14000, हरभराडाळ 6000-6200, मूगडाळ 9500-10000, मसूरडाळ 7100-7200, मटकीडाळ 9800-1000, उडीदडाळ 9000-11000 रु. कडधान्ये : हरभरा 5500-5700, हुलगा-9000-9500 चवळी 7000-15000, मसूर 6500-6800, मूग 9000-9500, मटकी गावरान 9000-9200, मटकी पॉलिश 7500-8000, मटकी गुजरात 8000-8200, मटकी राजस्थान 8000-8200, मटकी सेलम 11500-12000, वाटाणा हिरवा 7000-7200, वाटाणा पांढरा 5000-5200, काबुली चणा 10000-15000 रु. साबुदाणा : साबुदाणा नं.1 8000, साबुदाणा नं.2 7500, साबुदाणा नं. 3 7200 रु. वरई भगर : 11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1000-1100 रु. शेंगदाणा : जाडा 13050-14000, स्पॅनिश – 13000 घुंगरु 12500-12600 रु. धने : गावरान 8000-8500, इंदूर 9000-12000 रु.
मका लाल : 2475-2550, पिवळा लाल 2475-2550, पांढरा 3200-3300 . पोहे : मध्य प्रदेश 4100-4600, पेण 3700-4100, मध्यम पोहा-3900-4100, दगडी पोहा 4000-4800, पातळ पोहा 4800-5400, सुपर पोहा 4600-4900, भाजका पोहा 575-650, मका पोहा 625-675, भाजके डाळे 280-3400, मुरमुरा (9 किलोस) 525-550, भडंग 850-900, घोटी 430, सुरती 450 रु. रवा, मैदा, आटा : (50 किलोचा भाव) आटा 1500-1550, रवा 1550-1550, मैदा 1050-1550, बेसन :- (50 किलोस) 3450-3750 रु.मीठ : मीठ खडे (50 किलोस) 250, मीठ दळलेले (50 किलोस) 270 रु. मिरची : काश्मीरी ढब्बी 7000-75000, ब्याडगी 57500-60000, लवंगी तेजा 24000-25000, गुंटूर 25000-27000, खुडवा गंटूर 14000-15000, खुडवा ब्याडगी 17000- 20000 रु. नारळ : (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 1150-1250, मद्रास 2500-2600, पालकोल जुना 1400-1450, सापसोल 2000-2500 रु.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news