वीर सावरकर गौरव यात्रा
वीर सावरकर गौरव यात्रा

ठाणे : भाजप-शिवसेनेची वीर सावरकर गौरव यात्रा

Published on

ठाणे ; पुढारी वृत्‍तसेवा वीर सावरकरकें सन्मान मे पुरा हिंदुस्तान मैदान मे। वीर सावरकरांचा अपमान हिंदुस्‍तान सहन करणार नाही, अशा घोषणा देत ठाणे शहरातून आज (रविवार) भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी वीर सावरकर सन्मान यात्रा काढली. या यात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, नरेश म्हस्के भाजपचे ॲड. संदीप लेले सहभागी झाले होते.

सावरकर प्रखर हिदुत्‍ववादी, प्रखर देशभक्‍त होते. सावरकरांचा त्‍याग बलिदान विसरून त्‍यांचा अपमान होईल. काही लोक जाणीवपूर्वक त्‍यांचा अपमान करत आहेत. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना त्‍यांची जागा दाखवण्यासाठी ही यात्रा आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणाले.

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून काही लोक बसतात, मात्र यापुढे सावरकरांचा अवमान सहन करणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली.

यावेळी मार्गावर भगवे झेंडे लावण्यात आले होते. चौकाचौकात यात्रेवर शिवसौनिकांनी पुष्पवृष्टी केली. सावरकरांची प्रतिमा हातात घेवून नागरिकांनीही यात्रेचे स्वागत केले. भगव्या रंगाच्या आम्ही सावरकर लिहिलेल्या टोप्या कार्यकर्त्यांनी परिधान केल्या होत्या.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news