Human Become Immortal : मानव 2030 पर्यंत अमरत्व प्राप्त करेल, ‘या’ शास्‍त्रज्ञाचा दावा

Human Become Immortal : मानव 2030 पर्यंत अमरत्व प्राप्त करेल, ‘या’ शास्‍त्रज्ञाचा दावा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Human Become Immortal : पृथ्वीवर चालणारा-फिरणारा माणूस अमरत्व प्राप्त करू शकेल का? हा एक शतकानुशतके उपस्थित होणारा प्रश्न आहे. याचे आजपर्यंत कोणीच उत्तर देऊ शकलेले नाही. आजपर्यंत असे मानले जाते की, पृथ्वीवर जन्मणारा प्रत्येक जीव कधी ना कधी मरण पावतोच; पण एका शास्त्रज्ञांनी केलेला दावा ऐकून सर्वजण चकीत होऊ लागले आहेत. मानव लवकरच म्हणजे येत्या आठ वर्षांत अमरत्व प्राप्त करेल, असा त्या शास्त्रज्ञाचा दावा आहे.

अमरत्वाचा दावा करणार्‍या शास्त्रज्ञाचे नाव रे कुर्जविल असे असे असून ते भविष्यवेत्ते आणि संगणक शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या दाव्यानुसार 2031 पर्यंत मानव अमरत्व प्राप्त करेल. म्हणजेच अवघ्या आठ वर्षांनी मोठी क्रांती घडणार आहे. ते म्हणतात, आता आम्ही अशा स्थितीतून वाटचाल करत आहोत की, जेथे मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञांनी परिवर्तन होत आहे. याचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत आहे. आगामी काळात हेच तंत्रज्ञान आपले जीवन बदलून टाकू शकते. मानव आता अमरत्वाच्या रहस्याला उलगडण्याच्या जवळ आहे. आगामी 10 वर्षांच्या आत एक मोठा चमत्कार होऊ शकतो.

उल्लेखनीय म्हणजे रे कुर्जविल यांनी वर्तवलेली अनेक भविष्ये खरी झाली आहेत. कुर्जविल यांच्या मते, मानव आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये नवी उपलब्धी प्राप्त करण्याचा उंबरठ्यावर आहे. ज्यावेळी ती उपलब्धी प्राप्त होईल, त्यावेळी लोकांना भौतिक शरीरात राहण्याची गरजच नाही. हे सर्वकाही 2030 पर्यंत शक्य होणार आहे. दरम्यान, 1990 मध्ये कुर्जविल यांनी दावा केला होता की, भविष्यात संपूर्ण जग संगणकाचे गुलाम बनेल. सध्या सिद्ध झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news