ठाणे : कुणबी उद्योजक प्रोत्साहन परिषद संपन्न! | पुढारी

ठाणे : कुणबी उद्योजक प्रोत्साहन परिषद संपन्न!

मुरबाड ; पुढारी वृत्‍तसेवा ठाणे कुणबी चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आयोजित कुणबी उद्योजक प्रोत्साहन परिषद 2023 गडकरी रंगायतन ठाणे येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार दिगंबर विशे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या संपन्न झाली.

कुणबी समाजबांधवांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावे यासाठी ही परिषद उपयुक्त ठरेल असे मत  उदय सामंत यांनी व्यक्त केले. तर संस्थापक अशोक वालम यांनी कुणब्यांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी सर्वांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. आपले आर्थिक व राजकीय अस्तित्व आपणच उभे करू असेही वालम यांनी सांगितले.

ठाणे, पालघर, मुंबई, नवी मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील उद्योजक, नवउद्योजक, शेतकरी, शेतमजूर, महिला बचतगट, विद्यार्थी अशा कुणबी बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती. ज्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही त्यांच्यासाठी लाईव्ह कार्यक्रमाची ऑनलाईन लिंक उपलब्ध करून दिली होती. कुणबी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा लोगो आणि अधिकृत फेसबुक पेजचे यावेळी अनावरण करण्यात आले.

या परिषदेत केसीसीआयची संकल्पना अध्यक्ष प्रेमनाथ ठोंबरे यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दिले. सचिव ॲड अजय पाटील यांनी एकमेका सहाय्य करू अवघे करू प्रगती हे ब्रीद वाक्य उदघोषित करून कार्यकामाचे विस्तृत प्रास्ताविक करताना केसीसीआयच्या उपक्रमाची ध्येय धोरणे व उद्योगासाठी लाखांपासून पन्नास लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध होण्यासाठीची प्रक्रिया स्पष्ट केली. तसेच मुंबई कुणबी समाजोन्नती संघास मुलुंड वसतिगृहासाठी सरकारकडून सात कोटी रुपये दिल्याबद्दल संघाकडून मंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर अनेक तज्ज्ञ व्याख्यात्यांनी विविध विषयांवर उद्बोबोधक मार्गदर्शन केले.

आशिष राऊत, सुनिल आग्रे, असिस्टंट फूड कमिशनर कुमारी प्रियांका विशे श्री गुप्ते, सेवानिवृत्त सेल्स टॅक्स ऑफिसर अशोक विशे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दिगंबर विशे यांनी केसीसीआयच्या सर्व कार्यकारणीचे कौतुक केले. सहसचिव ॲड विनेश अशोक वालम यांनी सर्वांचे आभार मानले. निलेश सांबरे, दयानंद चिंचवलकर, अनुपम म्हसकर, श्रीधर कदम, सतीश सांबरे, भास्कर वडवले, खंडू चौधरी, सदाशिव लाटे यांनी विशेष सहकार्य केले.

या कार्यक्रमासाठी समाजभूषण किसन बोन्द्रे व ठाणे जिल्हा प्रमुख अशोक विशे यांनी मान्यवरांना सन्मान चिन्ह व मानाचा दुपट्टा दिला व यजमान म्हणून व्यवस्थापकाची भूमिका चोख बजावली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर मडके व सुनील माळी यांनी केले.

हेही वाचा :      

Back to top button