“गिरीश बापट यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद!” खासदार शरद पवार यांनी व्यक्त केल्या भावना | पुढारी

“गिरीश बापट यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद!” खासदार शरद पवार यांनी व्यक्त केल्या भावना

पुढारी ऑनलाईन: भाजपचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. बापट यांच्यावर प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बापट यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शरद पवार यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे आहेत. ते म्हणाले की, पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी ट्वीट करून त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली आहे.

 

 

Back to top button