डोंबिवली : भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी गर्भवती महिलेसह बालिका जखमी

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण पश्चिमेतील गंधारे भागातील अग्रसेन चौकात भरधाव दुचाकीने पायी चाललेल्या एका गर्भवती महिलेसह तिच्या दोन वर्षांच्या बालिकेला जोराची धडक दिली. यात ती महिला व बालिका जखमी झाली आहे. याप्रकरणी स्वाती पवार (रा. श्री. कॉम्पलेक्स) यांनी दुचाकी चालक विवेक सुधीर साबळे (वय १९, रा. मिलिंद नगर, कल्याण) याच्याविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
स्वाती पवार या मंगळवारी दुपारी आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह मुंबई विद्यापीठ भागातील अग्रसेन चौकातून पायी चालल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या विवेक याने स्वाती व त्यांच्या लहान मुलीला धडक दिली. यात स्वाती यांच्यासह मुलगी वर्तिकाच्या पायाला धडक बसल्याने त्या जखम झाल्या आहेत.
हेही वाचा :