ठाणे: मुंब्रात दुसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकले; ५ वर्षीय मुलाचा मृत्यू

ठाणे: मुंब्रात दुसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकले; ५ वर्षीय मुलाचा मृत्यू

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : मुंब्रा कौसा येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून दोन मुलांना फेकल्याप्रकरणी ठाण्यातील मुंब्रा पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. यातील एका पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. सईद जोहन हुसेन असे मृत मुलाचे नाव आहे, तर त्याची बहीण जैनाब (वय ४) यातून वाचली आहे, अशी माहिती मुंब्रा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिली. या घटनेतील आरोपी आसिफ हा देवरीपाडा, मुंब्रा येथील माउंट व्ह्यू बिल्डिंगमध्ये राहतो.

तो गेल्या एक वर्षापासून पीडितेच्या कुटुंबाशेजारी राहत होता. तो दोन्ही मुलांना चांगला ओळखतो. मुलांच्या आईने तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे आरोपीच्या पत्नीसोबत चांगले संबंध आहेत. पती-पत्नी वारंवार भांडत असत आणि त्यांना मुले नाहीत, असे तिने पोलिसांनी सांगितले. आरोपीला त्याच्या पत्नीचे शेजारी असलेल्या मुलांच्या आईशी वारंवार बोलणे आवडत नसे, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, शनिवारी दोन्ही मुले खेळत असताना ही घटना घडली. मुले इमारतीवरून पडल्यानंतर त्यांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्यांच्या मुलग्याला मृत घोषित करण्यात आले. तर मुलगी वाचली आहे. आसिफने तिला दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिल्याचे तिने सांगितले आहे.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news