छत्रपती संभाजीनगर : शिक्षक पात्रता परीक्षेसाठी जात असताना तरूणाचा अपघाती मृत्यू | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : शिक्षक पात्रता परीक्षेसाठी जात असताना तरूणाचा अपघाती मृत्यू

पैठण; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर येथे दुचाकी व हायवा ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील शिक्षक पात्रता परीक्षेसाठी जात असलेल्या एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (दि.१) पहाटे पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ढोरकिन परिसरात घडला. संजय माणिक पालवे, (वय ३६, रा.बडेवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे मृत तरूणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी संजय पैठण येथील पाहुण्यांकडे मुक्काम करून आज पहाटे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मोटरसायकलवरून जात होते. पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ढोरकिन येथे बिडकीनकडून येणाऱ्या हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात संजय हे ट्रकच्या टायरखाली पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी करून पंचनामा केला. याप्रकरणी हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा :

Back to top button