ठाणे : विटांच्या आड दारू तस्करीचा पर्दाफाश; पनवेलमध्ये ट्रकसह १ कोटीचे मद्य जप्‍त | पुढारी

ठाणे : विटांच्या आड दारू तस्करीचा पर्दाफाश; पनवेलमध्ये ट्रकसह १ कोटीचे मद्य जप्‍त

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : विटांखाली दारू लपवून तस्करी करणार्‍यांचा शनिवारी (दि. २५) पर्दाफाश झाला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या मुंबई पथकाने पनवेलमध्ये केली. या कारवाईत ट्रक व दारूचे 1300 बॉक्स असा 1 कोटी रुपयांचे सामान जप्त करून तीन जणांना अटक केली.

मुंबईतील हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारूची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या मुंबई पथकाला मिळाली. सदर माहितीच्या आधारे भरारी पथकाचे निरीक्षक संताजी लाड, मनोज चव्हाण, दुय्यम निरक्षक योगेश फटांगरे, शहाजी गायकवाड व अन्य पथकाने पनवेलमधील शिरढोण येथे सापळा लावला.

मिळालेल्या माहितीनुसार एमएच-04/ईव्हाय-1949 क्रमांकाचा ट्रक तेथे येताच त्याला भरारी पथकाने अडवला. ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये इमारतींसाठी लागणार्‍या विटा आढळून आल्या. त्या विटांखाली 1300 दारूचे बॉक्स लपवल्याचे निदर्शास आले. या बॉक्समध्ये विविध कंपन्यांची दारू, बिअरचा समावेश असल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले. सदर दारूसाठा मुंबईतील एका हॉटेलला पुरवण्यासाठी नेण्यासाठी आणला होता, अशी माहिती तपासादरम्यान उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे दारू तस्करीचे मोठे रॅकेट उजेडात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा;

Back to top button