बीड : केज तालुक्यातील तीन चंदन तस्कर ताब्यात; ५५ हजारांचा मद्देमाल जप्त | पुढारी

बीड : केज तालुक्यातील तीन चंदन तस्कर ताब्यात; ५५ हजारांचा मद्देमाल जप्त

केज; पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील भोपला येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन चंदन तस्कर ताब्यात घेतले आहे. मोटार सायकलसह त्यांच्याकडून ५५ हजारांचा मुद्देमाल आणि तस्करीसाठी वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील भोपला ते वरपगाव दरम्यान चंदन तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच स्थानिक गुंन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वाघ यांच्या आदेशाने पोलीस हवालदार मारुती कांबळे, पोलीस नाईक जायभाये, पोलीस नाईक पठाण, पोलीस अंमलदार यादव यांनी शनिवारी (दि.२५) फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान भोपला येथे सापळा लावला असता राजेंद्र किसन काळे (रा. इंदिरानगर कळंब) व त्यांचे साथीदार फारुक पाशा बागवान (रा. इंदिरा नगर कळंब), दत्तात्रय नारायण तावरे (रा. इंदिरा नगर, कळंब) हे तिघे मोटार सायकल (क्र. एम एच-२५/ ए सी-५६३२) वरून जात असताना आढळून आले. त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अडवून पंचा समक्ष झडती घेतली असता त्यांच्या सोबतच्या पिशवीत चंदन असल्याचे आढळून आले.

त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे चंदन तस्करी करण्यासाठी वापलरी जात असलेले साहित्य मिळून आले. त्यांच्याकडून पोलिसांनी १२ किलो ग्रॅम वजनाचे चंदनाचा गाभा, मोटार सायकल व चंदन तस्करी करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण ५५ हजार रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वाघ यांच्या आदेशाने पोलीस हवालदार मारुती कांबळे यांनी राजेंद्र किसन काळे, फारुक पाशा बागवान, दत्तात्रय नारायण तावरे विरुद्ध भा. दं. वि. ३७९, ३४ आणि भारतीय वन अधिनियम ४१, ४२ व महाराष्ट्र वन अधिनियम कलम २६ (एफ) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Back to top button