कल्याण : अनधिकृत मोबाईल टॉवरचा प्रश्न ऐरणीवर; इमारतीवर असणाऱ्या टॉवरला आग | पुढारी

कल्याण : अनधिकृत मोबाईल टॉवरचा प्रश्न ऐरणीवर; इमारतीवर असणाऱ्या टॉवरला आग

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : इमारतीवरील मोबाईल टॉवर कायदेशीर की बेकायदेशीर हा मुद्दा चर्चेत असताना कल्याण पूर्व येथील एका इमारतीच्या टेरेसवरील मोबाईल टॉवरवर आग लागल्याची घटना घडली आहे.

कल्याण पूर्वेतील अडवली गावात असणाऱ्या शिवशक्ती सोसायटीच्या टेरेसवरील मोबाईल टॉवरला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, टॉवरला लागलेल्या आगीमुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही क्षणातच आगीचा भडका उडाला. तब्बल तासाभराच्या प्रयत्नानंतर या मोबाईल टॉवरला लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.

दरम्यान, हा मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला. टॉवर काढण्याबाबत अनेकदा संबंधित बिल्डरकडे मागणी केली होती. मात्र, बिल्डरने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप  यावेळी स्थानिकांनी केला.

हेही वाचा;

Back to top button