29 कोटी विमाधारकांची एलआयसी मधील गुंतवणूक असुरक्षित, ‘आप’चे राज्य संघटक विजय कुंभार यांचा आरोप

29 कोटी विमाधारकांची एलआयसी मधील गुंतवणूक असुरक्षित, ‘आप’चे राज्य संघटक विजय कुंभार यांचा आरोप

पुणे, पुढारी वृत्तसेवा: एलआयसी व्यवस्थापकांनी बेजबाबदार व संशयास्पद गुंतवणूक केल्याने 29 कोटी सर्वसामान्य विमाधारकांची एलआयसीमधील गुंतवणूक असुरक्षित झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केला.

आम आदमी पार्टीच्यावतीने एलआयसी मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे शहरातील आपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. कुंभार म्हणाले, बॅलन्स शीट, शेअर्स ब्लॉक डील्स यांची शहानिशा न करता अदानी समूहाला आर्थिक मदत करण्याच्या हेतूने अदानी समूहाच्या समभागांमध्ये चढ्या किमतीने समभाग विकत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एलआयसीने सर्वसामान्य नागरिकांचे 41476.5 कोटी रुपये गुंतवले आहेत. आता हे समभाग घसरल्याने या गुंतवणुकीमध्ये एलआयसीचे 50 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. अदानी शेअर्स मधील एलआयसीची गुंतवणूक संशयास्पद असून मोठा घोटाळा झाला आहे. त्यात एलआयसी चेअरमन व गुंतवणूक समिती सदस्यांचा सहभाग असल्याचा आम आदमी पक्षाला संशय असून त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.

सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या या माहितीची कोणतीही शहानिशा न करता एलआयसीने मोठ्या प्रमाणावर अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे आणि त्यामुळे एलआयसी मधील 29 कोटी सामान्य विमाधारकांचे पैसे असुरक्षित झाले आहेत. याबाबतचे पुरावे देत आज आम आदमी पार्टी तर्फे श्रीकांत आचार्य यांनी सीबीआय व ईडीकडे लेखी तक्रार दाखल केली असून एलआयसीचे चेअरमन व गुंतवणूक समिती सदस्य यांच्यावर गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news