मोदी सरकारने संपूर्ण देश अदानी, अंबानींना विकून टाकला : विद्या चव्हाण | पुढारी

मोदी सरकारने संपूर्ण देश अदानी, अंबानींना विकून टाकला : विद्या चव्हाण

डोंबिवली,पुढारी वृत्तसेवा : कल्याण येथे झालेल्या महागाई विरोधी जागर या यात्रेत भगवा रंग हा त्यागाचे प्रतीक आहे. मात्र भाजपने परिधान केलेला भगवा रंग हा भोगाचे प्रतीक आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी लगावला.

पुढे बोलताना त्‍या म्‍हणाल्‍या, बेरोजगारांना नोकऱ्या देणार असे सांगून मोदी सरकारने तरुणांना फसवले आहे, इतकेच नव्हे तर संपूर्ण देश अदानी आणि अंबानींना विकून टाकला आहे. यावर कोणी काही बोलले तर लगेच त्यांच्यावर ईडी, सीबीआय यासारख्या कारवाई केली जाते. महिलांना आणि सामान्य नागरिकांची केवळ महागाई कमी व्हावी इतकी माफक अपेक्षा आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच, भाजपचे हिंदुत्व देखील पूर्णपणे ढोंगी आहे. ते ब्रिटिशांप्रमाणेच तोडा आणि राज्य करा अशा पद्धतीने देशावर राज्य करत आहेत. अनेक नवनवीन बाबा येथे महिलांवर लहान लहान मुलींवर अत्याचार करत आहेत तर दुसरीकडे मोदी मात्र संत तुकारामांचा वेश परिधान करून नागरिकांना फसवत आहेत.

केंद्र सरकार आणि सेन्सर बोर्डाला अश्लील गाणी आणि नग्न शरीर चित्रपटात दाखवणे मान्य असल्यामुळेच सर्वजण मुख गिळून गप्प आहेत. त्यामुळे चित्रा वाघ यांनी थेट केंद्र सरकार , मोदी आणि सेंसर बोर्ड यांची भेट घेऊन या संदर्भात विचारणा करावी असा सल्ला त्यांनी चित्रा ताई यांना दिला.

महाराष्ट्रातील हे सरकार तर अनधिकृत आहे. असंविधानिक आहे. केंद्रात भाजप सरकार असल्यामुळे हे महाराष्ट्रात सत्तेत बसले आहेत. कोर्टालादेखील प्रेशर दिले जात असून तारीख पे तारीख असे असा खेळ खेळला जात आहे. लोकशाहीचे चारही खांब दबावाखाली असल्याचे निदर्शनास येत आहे असे त्‍या म्‍हणाल्‍या.

-हेही वाचा 

तळेगाव दाभाडे नगर परिषदेची केवळ 29 टक्के वसुली, मालमत्ताधारकांवर होणार कारवाई; 71 टक्केथकीत कर भरण्याचे आवाहन

मोरगाव-पळशी रस्त्यावर पुलाचे काम धोकादायक

भिगवणचे ट्रामा सेंटर ठरले केवळ सांगाडा; चार वर्षांपासून इमारत धूळ खात पडून

Back to top button