जनाधार कमी झाल्यामुळे ठाकरे गटाची वंचित बहुजन आघाडीशी युती : दीपक केसरकर | पुढारी

जनाधार कमी झाल्यामुळे ठाकरे गटाची वंचित बहुजन आघाडीशी युती : दीपक केसरकर

सावंतवाडी, पुढारी वृत्तसेवा : जनाधार कमी झाल्यामुळे शिवसेनेकडून (ठाकरे गट) वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्वाचा मार्ग सोडला, याचा हा परिणाम आहे, अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केली. ते सावंतवाडी येथील आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.

खऱ्या शिवसैनिकाला जेव्हा उद्धव ठाकरे यांनी फक्त सत्तेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती केली होती, याची जाणीव होईल. तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे विचार अधिक तेजस्वी होतील. सारे शिवसैनिक बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील आणि धनुष्यबाण हे चिन्ह देखील आम्हालाच मिळेल, असा विश्वासही दीपक केसरकर यांनी यावेळी  व्यक्त केला.

केसरकर म्हणाले, ठाकरे गटाचे अस्तित्व संपलेले आहे. मात्र, बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी एकनिष्ठ आहे. ठाकरे गटाचा हिंदूत्वाचा विचार बदललेला आहे. मराठी माणूस शिवसेनेचा आत्मा होता. परंतु, तोच आता परगंदा झाला आहे. ते म्हणाले, संजय राऊत यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपेक्षा शरद पवार हे अधिक जवळचे आहेत. त्यामुळे त्यांची विधाने ही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठीच असतात.

हेही वाचा :

Back to top button