ठाणे : अनैतिक संबंधातून विवाहितेचा गळा चिरून खून | पुढारी

ठाणे : अनैतिक संबंधातून विवाहितेचा गळा चिरून खून

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : अनैतिक संबंधातून झालेल्या वादात एका विवाहित महिलेचा खून केल्याची घटना डोंबिवलीतील मानपाडा परिसरात घडली. दरम्यान, संशयीत आरोपीने स्वतःच पोलीस ठाणे गाठत आपण खून केल्याची कबुली मानपाडा पोलीस ठाण्यात दिली. यासंदर्भात संशयीतावर मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील चौकशी सुरू केली आहे.

मानपाडा रस्त्यावरील पाईप लाईन परिसरात राहणाऱ्या एका ४२ वर्षीय विवाहित महिलेचे तिच्या शेजारी राहणाऱ्या संदीप आहिरे यांच्या सोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. बुधवारी (दि.१४) दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर आरोपी संदीप याने महिलेच्या गळ्यावर चाकूने वार केले. यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर संशयीत आरोपी संदीप याने स्वतः मानपाडा पोलीस ठाणे गाठत विवाहित महिलेचा खून केल्याची कबुली दिली. संदीप हा अविवाहीत आहे. तर मृत महिलेचा पती खाजगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली. कल्याण पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button