ठाणे : आव्हाड यांना अटक करणारे पोलीस उपायुक्त राठोड यांची बदली | पुढारी

ठाणे : आव्हाड यांना अटक करणारे पोलीस उपायुक्त राठोड यांची बदली

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : हर हर महादेव चित्रपट वादाने चांगलाच पेट घेतला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी चित्रपट गृहातील शो बंद पडला. या प्रकरणी त्यांना अटक झाली आणि आता त्यांना जामीन मिळाला आहे. पण, या सर्व वादा दरम्यान नवी मोठी बातमी समोर आली आहे. जितेंद्र आव्हाड यांना अटक करणारे पोलिस उपायुक्त यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे या विषयाला आणखी हवा मिळाली. ही बदली म्हणजे डॉ. विनय कुमार राठोड यांचे बक्षीस असल्याचे मानले जात आहे.

चित्रपट गृहातील शो बंद पाडणे व यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. आव्हाड यांच्या अटकेने हर हर महादेव चित्रपटावरुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे विपर्यास करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आव्हाड यांनी हर हर महादेव या चित्रपटातून इतिहासाची मोडतोड करत चुकीचा इतिहास मांडला जात असल्याबाबत आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी त्यांनी ठाण्यातील चित्रपटगृहातील चित्रपटाचा शो सुद्धा बंद पडला. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली असा आरोप देखील जितेंद्र आव्हाड व त्यांच्या कार्यकर्त्यांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी आव्हाड यांना उपायुक्क डॉ. विनय कुमार राठोड यांनी अटक केली. आता जितेंद्र आव्हाड यांची जामिनावर सुटका झाली आहे.

दरम्यान या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना अटक करणारे पोलिस उपायुक्त डॉ. विनय कमार राठोड यांची बदली करण्यात आली आहे. राठोड यांची बदली वाहतुक विभागात करण्यात आली आहे. दरम्यान आव्हाड यांच्या अटकेनंतर लगेच राठोड यांची बदली झाल्याने हे त्यांना मिळालेले बक्षीस आहे, अशी चर्चा रंगली आहे.

अधिक वाचा :

Back to top button