ठाणे : पीएफआय संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याला भिवंडी येथून अटक | पुढारी

ठाणे : पीएफआय संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याला भिवंडी येथून अटक

भिवंडी; पुढारी वृत्तसेवा : देशविघातक व दहशतवादी कृत्यांना अर्थ साहाय्य केल्याचा आरोप असलेल्या पीएफआय संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याला सोमवारी रात्री भिवंडी येथून ठाणे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. आशिक शेख (रा. आमपाडा, भिवंडी) असे ताब्यात घेतलेल्या पीएफआय पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

दहशतवाद्‍यांना आर्थिक रसद पुरविणारी वादग्रस्त संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) संबंधित ठिकाणांवर राष्‍ट्रीय सुरक्षा संस्‍थेने (एनआयए) आज पुन्‍हा छापे टाकले. दिल्‍ली, उत्तर प्रदेशसह आठ राज्‍यांमध्‍ये ही कारवाई करण्‍यात आली. ‘पीएफआय’चे १००हून अधिक सदस्‍यांना अटक करण्‍यात आली असून या कारवाईत भिवंडी येथील एका पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. सोमवारी रात्री आशिक शेख याला अटक करण्यात आली. आता पर्यंत भिवंडीतून दोघांना अटक करण्यात आली आहे. याआधी 22 सप्टेंबर रोजी बंगालपूरा परिसरातून मोईनुद्दीन मोमीन याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button