ठाणे : आईला झोडपून पित्याचे डोके फोडणाऱ्या माथेफिरूस अटक | पुढारी

ठाणे : आईला झोडपून पित्याचे डोके फोडणाऱ्या माथेफिरूस अटक

डोंबिवली, पुढारी वृत्‍तसेवा : कल्याण जवळील कचोरे गावात न्यू गोविंदवाडीमध्ये राहणारे नामदेव वगप्पा घोरकडे (वय 55) हे सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करतात. आई रंजना हिच्याकडे तो जेवायला मागू लागला. यावर वडील नामदेव यांनी स्वतःच्या हाताने जेवायला घे, असे सांगितल्याने मुलगा अमितला राग आला. यातून त्‍याने  मारहाण केली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बाहेर गेलेला अमित घरी आला. आई रंजना हिच्याकडे तो जेवायला मागू लागला. यावर वडील नामदेव यांनी स्वतःच्या हाताने जेवायला घे, असे सांगितल्याने अमित याला राग आला. आई रंजनाला शिवीगाळ करुन मारहाण करु लागला. दरम्‍यान नामदेव हे त्यांच्या पत्नीला मुलाच्या तावडीतून सोडवत होते. त्यामुळे तो अधिकच भडकला. अमितने रागाच्या भरात घराशेजारी सिमेंटचा पत्रा नामदेव यांच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात नामदेव जखमी झाले. यानंतर पित्याचे डोके फोडून मुलगा पसार झाला. याबाबत वडीलांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पसार अमितला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा 

Accident : खुलताबाद – फुलंब्री रोडवरील तिहेरी अपघातात एक ठार तर दोघे जखमी 

गडचिरोली: ओल्या दुष्काळाच्या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी केले मुंडन 

तळेगावला परीक्षा रद्द करण्याची नामुष्की, प्रश्नपत्रिका मिळत नसल्याची माहिती कळाली नसल्याने विद्यार्थी अडचणीत

Back to top button